14 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ‘अस’ राहणार महाराष्ट्रातील हवामान ! पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज काय म्हणतोय ? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे.

तर काही भागात ढगाळ हवामान कायम आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक तयार परिस्थिती तयार झाली आहे.

मात्र आज राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे आहे. राज्यातील काही भागात मात्र ढगाळ हवामान कायम आहे. दरम्यान, कालपर्यंत बरसलेला अवकाळी पाऊस राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी मोठा मारक ठरला आहे.

या अवकाळी पावसाचा काढणीसाठी तयार झालेल्या भात पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय इतरही अन्य महत्त्वाच्या पिकांवर याचा विपरीत परिणाम झाला आहे.

अशातच आता जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब रावांनी 14 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता आहे का ? याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे.

काय म्हटले पंजाबराव ?

पंजाबरावांनी काल अर्थातच 13 नोव्हेंबर रोजी आपल्या नवीन हवामान अंदाजात राज्यात आता 25 नोव्हेंबर पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असे सांगितले आहे.

14 ते 25 नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि हळूहळू राज्यात थंडीचा जोर वाढेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात या कालावधीमध्ये कुठेच पाऊस बरसणार नाही असे त्यांनी सांगितले असून शेतकरी बांधवांनी आता आपल्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

पंजाबरावांनी आता महाराष्ट्रात हळूहळू थंडीची तीव्रता वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक हवामान तयार होणार असल्याचे चित्र आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा