Panjabrao Dakh Havaman Andaj : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. पंजाब डख हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच हवामान अंदाज देत असतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा त्यांच्या हवामान अंदाजावर मोठा गाढा विश्वास आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा त्यांच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा अधिक विश्वास असल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, पंजाबरावांनी नुकताच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन अंदाज दिला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
खरेतर, भारतीय हवामान खात्याने देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, आज पासून अर्थातच 29 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंतच्या तीन दिवसांच्या काळात राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात कोकण विभागात 29 आणि 30 मार्चला अवकाळी पावसाचा तडाका पाहायला मिळू शकतो. मध्य महाराष्ट्रात 29 आणि 30 मार्चला अवकाळी पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात देखील 29 आणि 30 मार्चला अवकाळी पाऊस बरसणार असे हवामान खात्याने यावेळी म्हटले आहे. दुसरीकडे विदर्भ विभागात मात्र 29 मार्च पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने यावेळी दिला आहे.
दरम्यान आता आपण पंजाबरावांनी कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आणि कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसणार ? याविषयी दिलेला सविस्तर हवामान अंदाज अगदी तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च रोजी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. म्हणजेच या कालावधीत जोराचा पाऊस पडणार नाही तर विखुरलेल्या स्वरूपाचा अन अगदी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
सर्वदूर पाऊस पडणार नाही तर त्या भागातील एखाद्या जिल्ह्यात पाच-सहा ठिकाणी पाऊस पडेल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या परिसरात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे.
परंतु खूप मोठा पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. मराठवाड्यातील परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर इत्यादी भागात या कालावधीमध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. दुसरीकडे पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण इतर भागापेक्षा काहीसे अधिक राहू शकते.
तसेच एप्रिल महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने होणार असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घेतली पाहिजेत. कारण की 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिल ला राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार आहे. त्यावेळी मात्र अवकाळी पावसाची तीव्रता काहीशी अधिक राहणार आहे.