Panjabrao Dakh Havaman Andaj : मार्च महिना संपण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. आता एप्रिल महिना सुरू होणार आहे. दरम्यान एप्रिल महिन्याची सुरुवात झाली की लगेचच शेतकऱ्यांची नजर मानसूनकडे वळत असते. खरंतर गेल्यावर्षी मानसून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला.
यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या पावसाळ्यात अनेकांना तर पिकाची पेरणी देखील करता आली नाही. कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे तसेच शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
यामुळे यंदाचा पावसाळा कसा राहणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. गेल्या पावसाळ्यावर एलनिनोचा प्रभाव पाहायला मिळाला होता.
याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या पावसाळ्यात फारसा पाऊस झाला नाही. राज्यातील काही भागात तर दुष्काळासारखी परिस्थिती आहे. यंदा मात्र तशी परिस्थिती तयार होणार नसल्याचा अंदाज काही जागतिक संघटनांनी व्यक्त केला आहे.
जागतिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यावर्षी म्हणजे 2024 मध्ये मान्सून काळात ला-निना साठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे आणि यामुळे यावर्षी चांगला पाऊस होणार असा कयास बांधला आहे.
अशातच जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी यावर्षी मान्सूनचा पहिला पाऊस केव्हा बरसणार, मान्सून 2024 ला केव्हा सुरवात होणार या संदर्भात मोठी माहिती दिली आहे.
काय म्हटलेत पंजाबराव
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन सात जूनला होत असते. सात जूनला राज्यातील तळकोकणात मान्सून पोहोचतो. त्यानंतर मग मान्सून मुंबईकडे रवाना होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रावर मान्सून पोहचतो.
गेल्या वर्षी मात्र मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात आला नाही. गेल्या वेळी जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनच आगमन झालं होत. मान्सूनच उशिराने आगमन झाले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
पण यंदा मात्र राज्यात मान्सून वेळेवर दाखल होणार असा अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी 2024 च्या पावसाळ्याचा पहिला अंदाज जारी केला आहे. यात ते म्हणालेत की, यंदा 21 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
तसेच, राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रात जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणीयोग्य पाऊस झालेला असेल असे सुद्धा डख यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सह्याद्रीच्या रांगांमद्धे मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होणार असे सुद्धा त्यांनी या अंदाजात म्हटल आहे.