Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ होत आहे. यामुळे राज्यात सर्वत्र मोठा उकाडा पाहायला मिळत आहे. उकाड्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ऑक्टोबर हिटचा नागरिकांना वाईट अनुभव येऊ लागला आहे.
विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने आगामी सात ते आठ दिवस असंच हवामान राहू शकत असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, ऑक्टोबर हिटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच मात्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात राज्यातील काही भागात नवरात्र उत्सवाच्या काळात पाऊस पडू शकतो असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. खरंतर, याआधी पंजाबराव डख यांच्या माध्यमातून यंदा नवरात्र उत्सवात कुठेच पाऊस पडणार नाही असे सांगितले गेले होते.
मात्र आता जेष्ठ हवामान तज्ञ डक यांनी नुकताच एक हवामान अंदाज वर्तवला आहे. या हवामान अंदाजात त्यांनी 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, देवगड आणि कोकणात पाऊस पडू शकतो असे पंजाबरावांनी सांगितले.
परंतु खूप मोठा पाऊस पडणार नाही हलका पाऊस पडणार आहे. गोव्यात विशेषता पणजीमध्ये देखील या कालावधीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र 25 ऑक्टोबर पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे.
28 ऑक्टोबर नंतर मात्र हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे आणि नोव्हेंबर मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.