पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : आज थर्टी फर्स्टच सेलिब्रेशन होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण सर्वजण आता नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर मात्र अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्रातील जनतेला अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे.

खरे तर नोव्हेंबर महिन्याची एंडिंग ही अवकाळी पावसाने झाली. यानंतर डिसेंबर महिन्याची सुरुवात ही देखील अवकाळी पावसाने झाली. विशेष म्हणजे आता नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने होणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या माध्यमातून समोर आला आहे.

खरंतर यावर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. मान्सून काळात कमी पाऊस झाला असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला. सोयाबीन, कापूस, कांदा जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन कमी झाले.

ज्या भागात समाधानकारक अशा पावसाची हजेरी लागली त्या ठिकाणी खरीप हंगामातून बऱ्यापैकी उत्पादन मिळाले मात्र त्यांनाही अधिकचा उत्पादन खर्च करावा लागला.

दरम्यान ज्या ठिकाणी मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस बरसलेला नाही तिथे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे संकट तयार होणार आहे.

यामुळे ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी पडलेला नाही अशा ठिकाणी सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस गुराढोरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा तरी प्रश्न दूर करेल असा आशावाद व्यक्त होत आहे. पण या अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिक यामुळे प्रभावित होत आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात आता 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे.

डख यांनी म्हटल्याप्रमाणे या कालावधीत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे. राज्यातील बहुतांश भागात या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

तसेच या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत डख यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज वर्तवला आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. तथापि नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हा डख यांचा हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा