Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसासंदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की, 30 आणि 31 ऑक्टोबरला राज्यात भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
हवामान खात्याने कोल्हापूर, सातारा आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. शिवाय पुढील दोन दिवस IMD ने राज्यात ढगाळ हवामान राहणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पुढील दोन दिवस राज्यात पाऊस पडणार नाही फक्त ढगाळ हवामान राहणार असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
अशातच आता पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट दिली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात आता पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
राज्यात 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आज आणि उद्या शेतीची सर्व आवश्यक कामे आवरून घ्यावीत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू असेल त्यांनी लवकरात लवकर हार्वेस्टिंग पूर्ण करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे पंजाबरावांनी सांगितले आहे.
सोयाबीन काढणीनंतर मळणी करून चांगला सुरक्षित ठिकाणी ठेवावा. कारण की, आता 3 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. 3, 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर अधिक राहणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या कालावधीमध्ये राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर कोकण या भागात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. यामुळे सातारा, सांगली, सोलापूर या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.