पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : 7 ते 11 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळी पाऊस बरसणार ! पहा काय म्हटले डख ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, सध्या शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत आहेत. आपल्या परिवारासमवेत शेत शिवारात रबी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे.

मात्र रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आता पावसाची गरज भासू लागली आहे. गहू, हरभरा यासह कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची नितांत गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ज्याप्रमाणे मान्सून काळात चातकाप्रमाणे शेतकरी बांधव मान्सूनच्या पावसाची वाट पाहत असतात अगदी त्याच धर्तीवर सध्या राज्यातील शेतकरी बांधव अवकाळी पावसाची वाट पाहत आहेत. अवकाळी पाऊस हा नेहमीच शेती पिकांसाठी घातक ठरतो.

परंतु बदललेले समीकरण पाहता आणि महाराष्ट्राला बसलेली दुष्काळाची झळ पाहता आता अवकाळी पावसासाठीच देव नवसला जात आहे. अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर पासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असून या पावसाची तीव्रता राज्यातील दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात अधिक पाहायला मिळणार आहे. मात्र या कालावधीत पडणारा पाऊस हा पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात कमी प्रमाणात बरसणार आहे.

कोणत्या भागात बरसणार अवकाळी पाऊस 

पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, अक्कलकोट, सांगली, जत, विटा, तुळजापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, दौंड, बारामती, पुणे, नाशिक, जुन्नर, ओतूर, उदगीर, देगलूर, निजामाबाद, मुंबई, अहमदनगर, ओझर, केज, धारूर, आंबेजोगाई, नांदेड, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, सेलू, माजलगाव, वैजापूर, गंगापूर, जालना, चिखली, पुसद, सिल्लोड, कन्नड, वाशिम, नाशिक, मनमाड, येवला, निफाड, कोपरगाव, वणी, श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी या भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

यासंबंधीत भागातील 30 किलोमीटरच्या परिघात या कालावधीमध्ये पाऊस बरसणार आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील पण पाऊस पडणार नाही याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन देखील पंजाबरावांनी केले आहे.

म्हणजेच वर दिलेल्या भागातच या कालावधीत पाऊस पडणार आहे या व्यतिरिक्त राज्यात दुसरीकडे कुठेच पाऊस पडणार नाही असे पंजाबरावांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

या जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक राहणार

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, सात ते अकरा नोव्हेंबर या पाच दिवसांच्या काळात राज्यातील अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, निजामाबाद, उस्मानाबाद, बीड, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नासिक या भागात जास्तीचा पाऊस पाहायला मिळू शकतो. म्हणजेच राज्यातील दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात जास्त पाऊस पडेल पण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात कमी पाऊस राहणार आहे.

दीपावली नंतर पुन्हा पाऊस बरसणार 

याशिवाय डख यांनी यंदा दिवाळीनंतर आणखी एक चांगला पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे. दिवाळी झाल्यानंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात आणखी एक चांगला पाऊस पडेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. निश्चितच शेतकऱ्यांना सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या चांगल्या वाढीसाठी पावसाची गरज आहे.

आणि अशातच पंजाबरावांच्या माध्यमातून राज्यात सात तारखेपासून पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष राहणार आहे.