पंजाबरावांनी 40 लाखाची फॉर्च्युनर कार का घेतली ? कुठून आला त्यांच्याकडे एवढा पैसा ? डख म्हणताय की…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Fortuner Car : तुम्हीही हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज केव्हा ना केव्हा ऐकला किंवा वाचला असेल. पंजाबराव हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये कायमच चर्चेत राहतात. त्यांचे हवामान अंदाज नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. यावर्षी मात्र पंजाबरावांचे हवामान अंदाज खूपच चुकले आहेत. यामुळे त्यांच्यावर अनेकांकडून टीकास्त्र डागण्यात आले आहेत. तर काही लोकांनी हवामान अंदाज चुकू शकतो, हवामान विभागाचा अंदाज चुकतो तर पंजाबरावांचा का चुकणार नाही असे म्हणत त्यांचा बचाव केला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरंतर पंजाबरावांचा हवामान अंदाज चर्चेत असतोच पण गेल्या काही दिवसांपूर्वी ते एका विशिष्ट गोष्टीमुळे चर्चेत आलेत. ती गोष्ट म्हणजे त्यांनी 40 लाख रुपयांची फॉर्च्यूनर कार खरेदी केली आहे.

यामुळे जुलैच्या महिन्यात म्हणजेच ऐन पावसाळ्याच्या काळात पंजाबरांचा हवामान अंदाजाव्यतिरिक्त त्यांच्या फॉर्च्यूनर कारबाबतच मोठ्या चर्चा पाहायला मिळाल्या आहेत. दरम्यान पंजाबरावांनी फॉर्च्यूनर गाडी का खरेदी केली, त्यांच्याकडे या गाडीसाठी एवढा पैसा कुठून आला या प्रश्नाचे उत्तर स्वतः पंजाबरावांनीच दिले आहे.

चाळीस लाखाची व्हीआयपी गाडी का खरेदी केली?

फॉर्च्यूनर ही एक व्हीआयपी कार आहे. आमदार, खासदार, मंत्री, उद्योगपती असे लोक या गाडीला विशेष प्राधान्य देतात. मग पंजाबरावांनी ही गाडी खरेदी का केली आणि यासाठी एवढा पैसा त्यांच्याकडे कुठून आला हा प्रश्न उपस्थित होणे वाजवी आहे.

दरम्यान त्यांनी एबीपी माझा या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते हवामान अंदाज वर्तवण्यासाठी आणि शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेडोपाडी फिरतात. आतापर्यंत ते बोलेरो या गाडीने प्रवास करत होते.

या गाडीमध्ये मात्र एकच एअर बॅग असल्याने अपघात होण्याची भीती असते. दररोज त्यांना हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो अशा स्थितीत बोलेरो गाडीने फिरणे थोडेसे धोकादायक होते. त्यामुळे त्यांच्या धर्मपत्नीने त्यांना सुरक्षित गाडी खरेदी करण्याचा सल्ला दिला.

जेणेकरून त्यांचे अपघातापासून संरक्षण होईल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या एका आरटीओ मित्राला कोणती गाडी घ्यावी याबाबत विचारले. तेव्हा त्यांना इनोव्हा गाडी घेण्याचे सुचवण्यात आले. परंतु इनोव्हा गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असतो.

यामुळे खेड्यापाड्यांमध्ये प्रवासासाठी इनोव्हा गाडी फायदेशीर ठरणार असल्याचे काही लोकांनी सुचवले. अशा परिस्थितीत मग त्यांनी फॉर्च्यूनर ही 40 लाख रुपयांची नवी कोरी गाडी घेण्याचा निर्णय घेतला. फोरचुनर कार मध्ये सात एअर बॅग असल्याने या गाडीने प्रवास करणे सुरक्षित राहू शकते म्हणून त्यांनी ही गाडी खरेदी केली.

गाडी घेण्यासाठी एवढा पैसा आला कुठून

अनेकांनी हा प्रश्न विचारला होता. याबाबत पंजाबरावांशी विचारणा केली असता त्यांना गाडी घेण्यासाठी आलेला खर्च शेतीच्या कमाईमधून मिळाला असल्याचे सांगितले. पंजाबरावांनी सांगितले की त्यांना शेतीमधून दरवर्षी सव्वाशे क्विंटल सोयाबीन आणि सव्वाशे क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळते. यातून त्यांना दरवर्षी चांगली कमाई होते.

आणि या शेतीच्या पैशातूनच त्यांनी ही नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. दरम्यान पंजाबराव बियाणे कंपन्यांकडून पैसे घेतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. याबाबत उत्तर देताना त्यांनी सांगितले की ते कोणत्याच कंपन्यांकडून पैसे घेत नाहीत.

तसेच कंपन्या त्यांना पैसे का देतील असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय, शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंजाबराव पैसे घेतात का ? असा देखील प्रश्न त्यांना विचारला गेला होता.

यावर उत्तर देताना त्यांनी शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रवासासाठी लागणारा खर्च आणि अल्पशे मानधन स्वीकाराले जाते असे सांगितले आहे. पण हा सारा पैसा प्रवासातच खर्च होतो. दरवर्षी गाडीसाठी लागणाऱ्या टायरसाठीच हा पैसा संपून जातो असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.