Panjabrao Dakh Cotton Farming : राज्यात खरीप हंगामामध्ये कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या विभागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करतात. खरंतर, कापसाचे पीक हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडे कापसाची एकरी उत्पादकता कमी झाली आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे कापूस पिकावर येणारी गुलाबी बोंड अळी. गुलाबी बोंड आळीमुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले असून राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात या बोंड आळीचा प्रादुर्भाव सर्वाधिक पाहायला मिळतो.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि बोंड अळीवर सहजतेने नियंत्रण मिळवता यावे यासाठी पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत आज आपण कापूस पिकावरील बोंड अळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पंजाब रावांनी शेतकऱ्यांना काय सल्ला दिला आहे ? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं मिळवणार बोंड आळी वर नियंत्रण?
कापूस पिकासाठी गुलाबी बोंड अळी घातक सिद्ध होत आहे. यामुळे या कीटकावर पहिल्या टप्प्यातच नियंत्रण मिळवण्याचा सल्ला दिला जातो. यात बोंड आळीची अंडी घालणाऱ्या पतंगावर नियंत्रण मिळवले तर गुलाबी बोंड आळीचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवता येतो.
यामुळे पंजाबरावांनी शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीची अंडी घालणाऱ्या पतंगावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक जुगाडाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, शेतकऱ्यांनी जर हा जुगाड केला तर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो. गुलाबी बोंड अळीचे पतंग नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक रिकामा तेलाचा डब्बा घायचा आहे.
हा डब्बा पिवळ्या कलरने रंगवायचा आहे. यात आतमध्ये प्रकाशासाठी बल्ब लावायचा आहे. तसेच हा डबा कापसाच्या पिकात ठीक-ठिकाणी बांधायचा आहे. या डब्यात मग गुलाबी बोंड अळीचे पतंग आकर्षित होतात. डब्यात बल्ब बसवल्याने डबा गरम होतो आणि यामध्ये अडकलेले पतंग मरण पावतात.
असा हा जुगाड कमी खर्चात शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी पासून पीक संरक्षित करण्यास मदत करणार आहे. याशिवाय कपाशी पिकात पिवळा चिकट सापळा लावण्याचा देखील सल्ला देण्यात आला आहे. या सापळ्यामुळे पांढरी माशी आणि थ्रीप्स कीटकांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.