Panjab Dakh News : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात ढगाळ हवामान पाहायला मिळाले आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला होता. ढगाळ हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे मात्र नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यासह फळबाग पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक तर आधीच गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
आता पुन्हा एकदा गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मात्र राज्यातील हवामान पूर्णपणे बदलले आहे.
आता पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात घट झाली असून यामुळे थंडीची तीव्रता वाढू लागली आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, आता अवकाळी पावसाचे सत्र पूर्णपणे थांबले आहे.
आता राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. पंजाबरावांनी 25 जानेवारी पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान हा हवामान अंदाज वर्तवण्यापूर्वी पंजाब रावांनी आधीच्या हवामान अंदाजात महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या अखेरीस पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असे सांगितले होते.
फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्याच्या पहिल्या अन दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला होता.
यामुळे आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पावसाची हजेरी लागते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. तथापि आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याने याचा शेती पिकांना मोठा फायदा होणार आहे.
हवामान कोरडे राहील आणि थंडीचा जोर हळूहळू वाढेल असा अंदाज आहे यामुळे रब्बी हंगामातील रब्बी पिकांना पोषक वातावरण तयार होणार आहे.