Panjab Dakh News : नुकत्याच दोन दिवसांपूर्वी जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी लोकसभेचा फॉर्म भरला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे राहिले आहेत. वंचित बहुजन आघाडी कडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे.
ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहणार होते मात्र ऐनवेळी त्यांना वंचितने संधी दिली आहे. त्यामुळे सध्या पंजाबराव विशेष चर्चेत आहे. प्रसार माध्यमांमध्ये त्यांच्याविषयी मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
अशातच त्यांनी आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अलर्ट जारी झाला आहे.
यात त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होणारा असा देखील अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.
किती दिवस महाराष्ट्रात पाऊस ?
पंजाब डख यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आठ ते 13 एप्रिल या सहा दिवसांच्या कालावधी महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला पूर्व विदर्भात पाऊस होईल त्यानंतर पश्चिम विदर्भात पाऊस होईल मग संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत पडणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह बरसणार असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या कालावधीत पूर्व विदर्भात तसेच पश्चिम विदर्भातील काही भागात गारपीट होऊ शकते असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. मराठवाड्यात देखील चार ते पाच दिवस पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
मराठवाड्यात सर्व दूर पाऊस होणार नाही मात्र काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील त्यांनी या कालावधीत पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये सध्या कांदा काढणी सुरू आहे आणि या कालावधीत तिथे पाऊस पडला तर त्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.