Pan Card Update : भारतात पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही दोन अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आहेत. या दोन कागदपत्रांचा शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच वित्तीय कामांसाठी वापर केला जातो.
ही दोन्ही कागदपत्रे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची आहेत. पॅन कार्ड हे एक प्रमुख शासकीय दस्तऐवज असून भारतीय आयकर भागाच्या माध्यमातून हे कागदपत्र भारतीय नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहे.
दरम्यान पॅन कार्ड बाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार देशातील जवळपास साडेअकरा कोटी नागरिकांचे पॅन कार्ड रद्द म्हणजे निष्क्रिय करण्यात आले आहे.
देशातील साडेअकरा कोटी पॅन कार्ड बंद झाले आहेत. खरंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांना लिंक करणे अनिवार्य आहे. Pan Card आधार सोबत लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एक जुलै 2017 नंतर ज्या लोकांनी पॅन कार्ड काढली असेल त्यांचे पॅन कार्ड ऑटोमॅटिक आधार सोबत लिंक झाले आहे. मात्र जुलै 2017 पूर्वी ज्या लोकांचे पॅन कार्ड तयार झाले असेल त्या लोकांना पॅन कार्ड आधार सोबत लिंक करावे लागणार आहे.
तथापि यासाठी 30 जून पर्यंत मुदत देण्यात आली होती. पण या मुदतीत अनेक लोकांनी पॅन कार्ड आधार सोबत लिंक केलेले नाही. एका आकडेवारीनुसार देशातील जवळपास साडेअकरा कोटी लोकांनी pan card आधार सोबत जोडलेले नाही.
काय म्हणते आकडेवारी
एका शासकीय आकडेवारीनुसार, देशात 70.24 कोटी पॅन कार्ड धारक लोक आहेत. यापैकी 57.25 कोटी लोकांनी पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले आहे. मात्र उर्वरित 11.50 कोटी लोकांनी Pan ला Aadhar सोबत लिंक केलेले नाही.
यामुळे या लोकांचे पॅन कार्ड बंद करण्यात आले आहेत अर्थातच निष्क्रिय झाले आहेत. तथापि या नागरिकांना एक हजार रुपयाचा दंड भरून आपले पॅन कार्ड सक्रिय करता येणार आहे. एक हजार रुपये दंड भरून पॅन कार्ड आधार सोबत अजूनही लिंक केले जाऊ शकते. आता आपण पॅन आधार सोबत लिंक करण्याची प्रोसेस समजून घेणार आहोत.
अस करा लिंक
यासाठी https://www.in-cometax.gov.in/iec/fo- portal/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. वेबसाईटवर गेल्यानंतर link Aadhar status या ऑप्शन वर क्लिक करा. यानंतर पॅन नंबर आणि आधार कार्ड नंबर टाका.
यानंतर व्युव्ह आधार लिंक स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार सोबत लिंक आहे की नाही हे समजणार आहे. जर तुमचे पॅन कार्ड आधार सोबत लिंक नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड आधार सोबत लिंक करावे लागणार आहे.