Pan Card Rename Process : पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे दोन अतिशय महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहेत. या दोन्ही कागदपत्रांविना भारतात कोणतेच शासकीय आणि निमशासकीय काम केले जाऊ शकत नाही. आधार कार्ड विना तर भारतात साधे एक सिम कार्ड देखील काढले जाऊ शकत नाही. आधार कार्ड हे विविध शासकीय कामांमध्ये आणि शासकीय कागदपत्र काढण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य आहे.
पॅन कार्ड बाबत बोलायचं झालं तर पॅन कार्ड हे विविध वित्तीय कामांमध्ये आवश्यक असते. बँकेत अकाउंट ओपन करण्यापासून ते कर्ज घेण्यापर्यंत आणि आयकर रिटर्न भरण्यासाठीही पॅन कार्ड आवश्यक असते. पॅन कार्ड हे भारतीय नागरिकांना आयकर विभागाच्या माध्यमातून जारी केले जाते.
मात्र अनेक पॅन कार्ड धारकांच्या माध्यमातून जर पॅन कार्ड वरील नाव चुकले असेल तर ते नाव कसे बदलायचे असा सवाल उपस्थित केला जात होता. खरे तर पॅन कार्ड हे एका व्यक्तीला एकदाच मिळते.
म्हणजेच पॅन कार्ड वरील नंबर हा युनिक असतो. जर पॅन कार्ड वर नाव चुकले तर असे पॅन कार्ड हे कोणत्याच कामात येत नाही. पण पॅन कार्ड वरील नाव दुरुस्त करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. दरम्यान आज आपण घरबसल्या पॅन कार्ड वरील नाव कसे चेंज करायचे हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
घरबसल्या पॅन कार्ड वरील नाव कसे चेंज करणार
जर तुमच्याही पॅन कार्ड मध्ये तुमचे नाव चुकीचे प्रविष्ट झालेले असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण की पॅन कार्ड वरील नाव आता घरबसल्या चेंज करता येणार आहे. यासाठी तुम्हाला भारतीय आयकर विभागाच्या https://onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
यानंतर, तुम्हाला Apply Online च्या पर्यायामध्ये एप्लीकेशन टाईप मध्ये करेक्शन अँड चेंजेस अर्थातच सुधारणा आणि बदलांचा पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला श्रेणी निवडावी लागेल. त्यानंतर खाली विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
ज्यामध्ये तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकावा लागणार आहे. यानंतर, कॅप्चा प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला सबमिट वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला केवायसीसाठी भौतिक आणि डिजिटल पर्याय मिळतील.
ज्यामध्ये तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. डिजिटल पर्यायामध्ये, तुम्ही आधारद्वारे ई-केवायसी करू शकता. ई-केवायसीसाठी आधारचा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. आणि मग तुम्हाला तुमचे दुरुस्त केलेले पॅन कार्ड कसे मिळवायचे आहे.
तो मोड निवडण्याची खात्री करा. यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार क्रमांक टाकावे लागतील. यानंतर तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे. तुम्हाला तेच नाव पॅन कार्डसाठी देखील टाकावे लागेल, त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागणार आहे. यशस्वी पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला Continue वर क्लिक करून पुढे जावे लागणार आहे.
यानंतर तुमचे आधार कार्ड UIDAI द्वारे सत्यापित केले जाईल. यानंतर तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. जे प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल. तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला जाईल. त्यानंतर महिनाभरात तुमचे पॅनकार्ड नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल.