Online Property Card Maharashtra :- ‘डिजिटायझेशन’ ही संकल्पनाच खूप महत्त्वपूर्ण असून यामुळे बऱ्याच प्रकारचे कामे एकदम पटकन होतात आणि होणारा मनस्ताप देखील टळतो. यामध्ये जर आपण जमिनीच्या बाबतीत विचार केला तर अनेक प्रकारची कागदपत्रे आता ऑनलाईन पद्धतीने मिळत असल्यामुळे नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होत आहे.
महत्वाचे म्हणजे वेळेत बचत होते आणि काम देखील वेळेत होत असल्याने होणारा मनस्ताप देखील टळतो आता प्रत्येक क्षेत्रामध्ये हळूहळू कामे ऑनलाईन पद्धतीने केली जात असल्यामुळे याचा खूप मोठा फायदा होताना दिसून येत आहे.
हे पण वाचा : शेतजमीन मोजणी करायची का? मग ‘या’ पद्धतीने अर्ज करा
याच पार्श्वभूमीवर शासनाने ऑनलाइन प्रॉपर्टी कार्डच्या बाबतीत देखील एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता ऑनलाइन प्रॉपर्टी कार्डची हस्तलिखित व फोटोकॉपी प्रमाणित नकलांचे वितरण एक जानेवारीपासून पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता ऑनलाइन प्रॉपर्टी कार्डलाच कायदेशीर मान्यता दिली आहे. म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा शासकीय कामासाठी हे ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे.
ऑनलाइन प्रॉपर्टी कार्डला मिळाली कायदेशीर मान्यता
1 जानेवारी म्हणजेच कालपासून हस्तलिखित व फोटोकॉपी प्रमाणित नकलांचे वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला असून ऑनलाईन प्रॉपर्टी कार्डलाच आता कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.
हे पण वाचा : दिलासादायक ! ‘या’ ठिकाणी कांद्याला मिळाला सर्वोच्च दर ; वाचा आजचे बाजारभाव
कोणत्याही परिस्थितीत प्रॉपर्टी कार्डची हस्तलिखित व फोटोकॉपीची प्रमाणित नकल देऊ नये, अशा आशयाच्या सूचना शासनाने संबंधित विभागांना दिले आहेत. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचे शासकीय अथवा निमशासकीय कामकाजासाठी हे ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे.
राज्यातील सिटीसर्वे अर्थात नगर भूमापन भागात प्रॉपर्टी कार्ड व्यवस्थापना करता ई प्रॉपर्टी कार्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम राबवण्यात येत असून त्या माध्यमातून हे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. एवढेच नाही तर खरेदी तसेच बक्षीस पत्र, हक्क सोड, वाटप, भाडेपट्टा, बोजा दाखल करणे अथवा कमी करणे इत्यादी साठीच्या नोंदणीकृत कागदपत्रांच्या अर्थात दस्ताच्या आधारे ऑनलाइन फेरफार घेण्यात येत आहे.
हे पण वाचा : ऑनलाइन 8-अ (खाते उतारा) काढण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
डिजिटल स्वाक्षरीत अपडेट केलेले संगणकीकृत तयार होणारे प्रॉपर्टी काढा नागरिकांसाठी महाभुमी या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून डिजिटल स्वाक्षरीत असलेले प्रॉपर्टी कार्ड, फेरफार, नमुना नऊ व बाराची नोटीस या सर्व कायदेशीर व अशासकीय, निमशासकीय कामकाजासाठी वैध राहतील असा निर्णय शासनाने घेतला आहे.
यामुळे आता ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड तसेच फेरफार नोंदवहीचा उतारा इत्यादी वर भुकरमापक किंवा भूमापक, मुख्यालय सहाय्यक अथवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याची शाईने केलेली स्वाक्षरी असण्याची गरज नसल्याचे देखील शासनाने म्हटले आहे.
हे पण वाचा : सातबारा उतारा ऑनलाईन कसा काढायचा ? वाचा याविषयी सविस्तर माहिती