Online Jamin Nakasha : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहता येतो याबाबत जाणून घेणार आहोत. खरंतर जमिनीचा नकाशा शेतकऱ्यांसाठी विविध कामांमध्ये उपयोगाला येतो.
शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असो किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असो या सर्व कामांमध्ये जमिनीचा नकाशा लागतो. मात्र अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा नकाशा कसा काढायचा याबाबत माहिती नसते.
हेच कारण आहे की आज आपण ऑनलाइन जमिनीचा नकाशा कशा तऱ्हेने काढला जातो. घरबसल्या मोबाईलचा वापर करून ऑनलाईन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा याविषयी जाणून घेणार आहोत.
ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा काढणार
वास्तविक आधी ऑनलाइन जमिनीचा नकाशा काढण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे आधी जेव्हा केव्हा शेतकऱ्यांना जमिनीचा नकाशा लागत असे तेव्हा त्यांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असत. यात शेतकऱ्यांचा बहुमूल्य असा वेळ वाया जात असे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागे.
म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याप्रमाणे भूमी अभिलेख विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा आणि आठ अ उतारा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे आता जमिनीचा नकाशा देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध झाली आहे. जर तुम्हालाही तुमच्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा पाहायचा असेल तर तुम्हाला भूमी अभिलेख विभागाच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे.
http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/ या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लोकेशन या पर्यायावर जायचे आहे. या पर्यायावर गेल्यानंतर तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचे आहे म्हणजे महाराष्ट्र हा पर्याय निवडायचा आहे.
यानंतर तुमची जमीन जर शहरी भागात असेल तर शहरी आणि जर ग्रामीण भागात असेल तर ग्रामीण हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गाव हे निवडायचे आहे. मग तुम्हाला विलेज मॅप या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर तुमच्या गावाचा नकाशा ओपन होईल.
तसेच जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा पाहिजे असेल तर या वेबसाईटवर असलेल्या सर्च बाय प्लॉट नंबर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला तुमचा गट क्रमांक टाकून जमिनीचा नकाशा पाहता येणार आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीची सविस्तर माहिती पाहता येणार आहे आणि नकाशा देखील पाहता येणार आहे.
या पेजेच्या खाली तुम्हाला मॅप रिपोर्ट नावाचा पर्याय दिसतो. यावर क्लिक केले की तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट स्क्रीनवर ओपन होतो. विशेष म्हणजे हा रिपोर्ट किंवा नकाशा खाली देण्यात आलेल्या डाऊनलोड बटनावर क्लिक करून डाउनलोड देखील करता येणार आहे.