Onion Rate : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची एक सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे समोर येत आहे. ही बातमी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की आज राज्यात कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. खरंतर शेतकऱ्यांनी फेब्रुवारी ते जून या कालावधीत खूपच कवडीमोल दरात कांदा विक्री केला.
या कालावधीत मात्र पाच ते सहा रुपयाचा भाव मिळाला होता. काही ठिकाणी तर दोन ते तीन रुपये प्रति किलो असा किमान दर मिळाला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक उत्पादित करण्यासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही. परिस्थिती एवढी बिकट बनली होती की राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य शासनाने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.
या अनुदानाचा पहिला टप्पा नुकताच वितरित झाला आहे. दरम्यान जुलै महिन्यात कांद्याच्या बाजार भावात चांगली वाढ झाली होती. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर कांद्याला विक्रमी भाव मिळाला होता. मात्र त्यावेळी किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती वेगाने वाढत होत्या.
त्यामुळे किरकोळ बाजारातील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यात शुल्क सुरू करण्याचा निर्णय घेतला. माल निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा मोठा निर्णय केंद्र शासनाकडून देण्यात आला. या निर्णयामुळे कांदा बाजार पुन्हा एकदा मंदीत आला. पण आता गेल्या काही दिवसांपासून हळूहळू कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होत आहे.
आज राज्यातील एका महत्त्वाच्या बाजारात कांद्याला तब्बल 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळत आहे. कांद्याच्या दरात आलेल्या विक्रमी तेजीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा या निमित्ताने पल्लवीत झाल्या आहेत.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 654 क्विंटल कांदा आवक झाली आणि या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान दोन हजार रुपये प्रति क्विंटल, कमाल 4200 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 309 क्विंटल कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 700, कमाल 4000 रुपये आणि सरासरी 2350 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.