Onion Rate : कांदा बाजारभावात मोठा बदल ! आवक कमी तरी कांदा दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात कांदा या नगदी पिकाची (Cash Crop) शेती करत असतात. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा (Onion Crop) या नगदी पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.

दरम्यान आता कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) सुधारणा पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कांद्याच्या दरात (Kanda Bajarbhav) थोडीशी सुधारणा नमूद केली गेली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

मात्र असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी बाजार भावात यावर्षी 47% कमी आली आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार महिने कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या अडचणीत वाढ होत आहे.

मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण कांद्याच्या बाजार भावाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :– राहता एपीएमसीमध्ये आज 7280 क्विंटल कांद्याची आवक झाली. झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2350 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज लोकल कांद्याची 13 हजार 19 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 550 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 578 कोणत्या लोक लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती  :- या एपीएमसीमध्ये आज उन्हाळी कांद्याची 899 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये कांद्याला 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव दोन हजार 600 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 3760 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 525 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार 425 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1775 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये उन्हाळी कांद्याची 18 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1900 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment