Onion Rate : मित्रांनो महाराष्ट्रात कांदा (Onion Crop) एक प्रमुख नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ नव्हे नव्हे तर कोकणात आणि खानदेशात देखील कांद्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विशेष म्हणजे राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Bazar Bhav) सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत होता. मात्र कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. सध्या कांद्याला 1100 रुपये प्रति क्विंटल ते 2100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सर्वसाधारण बाजार भाव मिळत आहे. मित्रांनो खरं पाहता सध्या मिळत असलेल्या बाजार भाव अजूनही कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Onion Grower Farmer) मनासारखा नाही.
मात्र असे असले तरी आता कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याचे चित्र असल्याने कांदा उत्पादक शेतकरी तूर्तास तरी सुखावला आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोज कांद्याच्या बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण कांद्याच्या बाजार भावाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या बाजार समितीत आज 2409 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2 हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसीमध्ये आज सात हजार 514 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये लाल कांद्याला 100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 129 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सहा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1871 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1250 रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव एपीएमसीमध्ये आज 6480 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1810 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1525 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- कळवण एपीएमसीमध्ये आज 13400 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2 हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 411 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज पाच हजार दोनशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2026 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- मनमाड एपीएमसी मध्ये आज दोन हजार 100 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1652 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- देवळा एपीएमसीमध्ये आज पाच हजार पाचशे तीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1755 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 300 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून एक हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल राहिला आहे.
कराड कृषी उत्पन्न बाजार समिती :- कराड एपीएमसीमध्ये आज 99 क्विंटल हालवा कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.