Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता हळूहळू कांदा बाजार भावात सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
खरं तर डिसेंबर 2023 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने देशांतर्गत किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी लागू करण्याचा मोठा तुगलकी निर्णय घेतला होता. किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती वाढत असल्याने सरकारने थेट शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा निर्णय घेतला.
कांदा निर्यात बंदी लागू झाली. तेव्हापासून कांदा बाजारभावात घसरन झाली होती. यामुळे कांदा निर्यात बंदी मागे घेतली गेली पाहिजे अशी मागणी व्यापारी, निर्यातदार आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केली जात होती.
निवडणुकीच्या काळात या मागणीने सर्वाधिक जोर पकडला आणि याला विपक्षमधील नेत्यांची देखील मोठी साथ मिळाली. यामुळे केंद्रातील सरकारवर मोठा दबाव तयार झाला आणि अखेर कार केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
हा निर्णय झाला आणि त्याच दिवशी राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला. मात्र ही भाव वाढ जास्त काळ टिकू शकली नाही आणि पुन्हा एकदा बाजारभावात मोठी घसरण पाहायला मिळाली.
आता मात्र पुन्हा एकदा बाजार भावात सुधारणा होत असून आज राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याला 2500 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिकचा कमाल भाव मिळाला आहे. दरम्यान आता आपण आज राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला नेमका काय भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च भाव
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : आज राज्यातील सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याला सर्वाधिक कमाल दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 100, कमाल 2750 आणि सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 700, कमाल २५०० आणि सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1500, कमाल 2500 आणि सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
सांगली फळे-भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 800, कमाल 2400 आणि सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
वडगाव पेठ कृषी उत्पन्न बाजार समिती : पणनच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1800, कमाल 2400 आणि सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 500, कमाल 2370 आणि सरासरी 1800 रुपये असा भाव मिळाला आहे.