Onion Rate News : लोकसभा निवडणुकीत कांद्याचा मुद्दा हा चांगलाचं चर्चेत राहिला आहे. कमी बाजारभावामुळे राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. नाशिक, धुळे, अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला कांद्याचा मुद्दा तापदायक ठरला असून अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.
दरम्यान येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका रंगणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा एकदा कांद्याचा मुद्दा हा वरचढ ठरण्याची शक्यता आहे. कांदा हा सत्तेचे समीकरण ठरवणार अशी शक्यता आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर आता कांद्याच्या बाजारभावात चांगली सुधारणा होऊ लागली आहे. लाल, लोकल आणि उन्हाळी कांद्याला राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये चांगला दर मिळत आहे. आज उन्हाळी कांद्याला महाराष्ट्रातील एका प्रमुख बाजारात हंगामातील सर्वोच्च दर मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक म्हणजेच 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 4000 आणि सरासरी चार हजार 100 चा दर मिळाला आहे. अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील इतर प्रमुख बाजारांमधील उन्हाळी कांद्याचे बाजार भाव थोडक्यात जाणून घेणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमधील उन्हाळ कांदा बाजारभाव
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3,100 आणि सरासरी 2750 असा दर मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3150 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1100, कमाल 3311 आणि सरासरी 3100 चा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान एक हजार दोनशे, कमाल 3411 आणि सरासरी तीन हजार 100 असा दर मिळाला आहे.
अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये अजूनही कांद्याला किमान 400, कमाल 3151 आणि सरासरी 2651 रुपये असा दर मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 400, कमाल 3211 आणि सरासरी 1806 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान एक हजार, कमाल 3,050 आणि सरासरी 2600 असा भाव मिळाला आहे.