Onion Rate News : गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. लोकसभा निवडणुकीआधी दबावात असणारे बाजार भाव आता सुधारले आहेत. अनेक बाजारांमध्ये कांद्याला विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांनंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहेत.
आधी कवडीमोल दरात कांदा विक्री करावा लागला असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता मात्र आता कांद्याला चांगलं दर मिळत असल्याने हे आर्थिक नुकसान भरून काढता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
आज देखील राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजूनही कांद्याला तब्बल 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.
इतरही बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारात उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला ?
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला कमाल 4,200, किमान 4,000 आणि सरासरी 4,100 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी खाण्याला किमान 800, कमाल 3,352 आणि सरासरी 2,950 असा भाव मिळाला आहे.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 900, कमाल 3,265 आणि सरासरी 2,965 रुपये असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1200, कमाल 3200 आणि सरासरी 3 हजार 50 असा दर मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1200, कमाल 3376 आणि सरासरी 3 हजार 25 असा भाव मिळाला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3199 आणि सरासरी 2850 रुपये भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : अहमदनगर जिल्ह्यातील या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 500 कमाल 3611 आणि सरासरी 2056 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.