Onion Rate News : कांदा उत्पादकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढू लागले आहेत. सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या धामधुमीत कांदा उत्पादकांची टामटूम होणार असे चित्र आहे. ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वधारू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
घाऊक बाजारात कांद्याचे भाव प्रति किलो दहा रुपये प्रमाणे वाढले आहेत. नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील बाजारांमध्ये ही भाव वाढ नमूद करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील चाकण येथे कांद्याला कमाल 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये देखील अशीच भाव पातळी पाहायला मिळत आहे.
देशातील इतर राज्यांमध्ये देखील कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. देशातील अनेक बाजारांमध्ये कांदा 25 ते 27 रुपये प्रति किलो या दरात विकला जात आहे.
साहजिकच याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना होत आहे. मात्र कांद्याचे बाजार भाव अचानक वाढत का आहेत ? याचे महत्त्वाचे कारण काय आहे. याच बाबत आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कांद्याचे बाजार भाव वाढण्याचे कारण काय
खरेतर केंद्र शासनाने डिसेंबर 2023 मध्ये कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू राहणार आहे.
मात्र कांदा निर्यात बंदी लागू असतानाही केंद्र शासनाने आपल्या मित्र देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र शासनाने बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान या देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
याशिवाय UAE ला देखील कांदा निर्यात केला जाणार आहे. बांगलादेश ला 50000 टन आणि UAE ला 14,400 टन कांद्याची निर्यात होणार आहे. एनसीइएल या सरकारी संस्थेच्या माध्यमातून या देशांना कांदा निर्यात होणार आहे.
याचा परिणाम म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल अशी आशा आहे. विशेष म्हणजे याचा फायदा व्यापाऱ्यांना देखील होणार आहे.