Onion Rate Maharashtra : गेल्या अनेक महिन्यांच्या मंदीनंतर आता कुठे कांदा बाजारभावात थोडीशी तेजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 मध्ये केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. निर्यात बंदीमुळे कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कमी झालेत. बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही.
यामुळे लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली. दरम्यान हीच नाराजी कमी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्रातील सरकारने घाईघाईने निर्यात बंदी मागे घेण्याची घोषणा केली.
निर्यात बंदी मागे घेतली पण निर्यातीसाठी निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य कायम ठेवण्यात आले. यामुळे निर्यात बंदी मागे घेतली गेली असली तरी देखील याचा फारसा शेतकऱ्यांना फायदा होणार नव्हता. झालं देखील तसंच निर्यात बंदी मागे घेण्याच्या निर्णयानंतर देखील कांदा बाजार भाव आज सुधारणा झाली नाही.
पण, लोकसभा निवडणुकीनंतर कांदा बाजारातील चित्र आता बदलले आहे. याचे कारण म्हणजे आगामी बकरी ईद सणाच्या निमित्ताने कांद्याला मोठी मागणी आली आहे. बाजारातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे दक्षिणेकडील राज्यांमधून कांद्याला मोठी मागणी आली आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण या चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 3,100 आणि सरासरी 2050 असा भाव मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 2200 आणि सरासरी 1600 असा भाव मिळाला आहे.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 600, कमाल 3300 आणि सरासरी 2750 असा भाव मिळाला आहे.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : अहमदनगर जिल्ह्यातील या बाजारात एक नंबर कांद्याला किमान 2100, कमाल 3200 आणि सरासरी 2100 असा भाव मिळाला आहे. तसेच दोन नंबर कांद्याला किमान 1100, कमाल 2000 आणि सरासरी 2000 चा भाव मिळाला आहे. तीन नंबर कांद्याला या बाजारात आज किमान 500, कमाल 1 हजार आणि सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 2800 आणि सरासरी 2600 असा भाव मिळाला आहे.
सिन्नर नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 2900 आणि सरासरी 2750 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3,071 आणि सरासरी 2750 असा भाव मिळाला आहे.