Onion Rate Maharashtra : भारतात 9 नोव्हेंबरपासून दीपावलीचा सण साजरा केला जात असून 15 नोव्हेंबर पर्यंत दीपावलीचा सण साजरा होणार आहे. यंदा मात्र दिवाळीच्या काळातही राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी पावसाळ्यात खूपच कमी पाऊस बरसला आहे. पाऊसमान कमी असल्याने सोयाबीन, कापूस, कांदा समवेतच सर्वच महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकतर उत्पादनात घट आली आहे आणि दुसरे म्हणजे शेतमालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. सोयाबीन, कापूस समवेतच सर्वच शेतमालाच्या भावात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. सोयाबीन आणि कापसाचे भाव तर गेल्या एका वर्षापासून दबावत आहेत.
कांद्याच्या बाबतीत देखील तसंच काहीसं चित्र होतं. कांद्याचे बाजारभाव जानेवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीत दबावात होते. मात्र कांद्याच्या दरात जुलै महिन्यापासून सुधारणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे कमाल बाजार भाव तब्बल 6,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते.
सरासरी बाजारभाव देखील 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आले होते. मात्र शासनाने कांद्यासाठी किमान निर्यात मूल्य 800 डॉलर प्रति टन वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कांद्याची निर्यात मंदावली आहे. तसेच किरकोळ बाजारात केंद्र शासनाच्या माध्यमातून कांदा 25 रुपये प्रति किलो या भावात विकला जात आहे.
यामुळे सध्या देशांतर्गत कांदा बाजार भाव पुन्हा एकदा कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे कमाल बाजार भाव 4000 ते 5000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान फिरत आहेत. सरासरी बाजारभाव मात्र 2500 ते 3500 दरम्यानच पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी यापेक्षा अधिक भाव मिळत आहे
मात्र अशा बाजार समित्यांची संख्या खूपच मोजकी आहे. दरम्यान आज देखील राज्यात कांद्याचे बाजार भाव याच भावपातळीवर पाहायला मिळाले आहेत. दरम्यान आज आपण दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कांद्याला काय भाव मिळाला ?
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 5968 क्विंटल कांदा आवक झाली. आजच्या लिलावा त्या मार्केटमध्ये कांद्याला किमान एक हजार पाचशे, कमाल 5000 आणि सरासरी 3400 एवढा भाव मिळाला.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 200, कमाल चार हजार पाचशे आणि सरासरी 2350 एवढा भाव मिळाला.
दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 2700, कमाल 5,100 आणि सरासरी चार हजार दोनशे एवढा भाव मिळाला.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3000, कमाल 4501 सरासरी चार हजार 100 एवढा भाव मिळाला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 2000, कमाल 4600 आणि सरासरी 3300 एवढा भाव मिळाला आहे.
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3500, कमाल 3500 आणि सरासरी 3500 एवढा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 2000, कमाल 4501 आणि सरासरी 3750 एवढा भाव मिळाला आहे.