Onion Rate Maharashtra : गेल्या आठवड्याभरापासून कांदा बाजार भाव तेजीत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत कांद्याला चांगला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. खरे तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कांद्याला फारच कवडीमोल दर मिळत होता. यामुळे गत लोकसभा निवडणुकीत कांद्याचा प्रश्न विशेष चर्चेत होता.
कांद्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला मोठ्या प्रमाणात घेरले होते. महत्त्वाचे म्हणजे कांद्याचा मुद्दा महायुती सरकारला चांगलाच महागात देखील पडला होता. असाच फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी सध्या सरकारकडून तेजीत असणारे कांद्याचे दर पाडण्यासाठी कोणतेच प्रयत्न होत नाहीत.
यामुळे कांद्याला चांगला समाधानकारक असा भाव मिळत असून आज आपण आजच्या लिलावात अर्थातच रविवारच्या लिलावात कांद्याला काय दर मिळाला आहे? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर आज रविवार असल्याने राज्यातील फारच निवडक बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव झालेत.
आज राज्यातील सात बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव झाले असून कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे. आता आपण बाजार समिती निहाय कांद्याचे भाव थोडक्यात समजून घेणार आहोत.
कोणत्या बाजारात कांद्याला मिळाला सर्वाधिक दर?
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3600, कमाल 7000 आणि सरासरी 5300 असा दर मिळाला आहे.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 3000, कमाल 6810 आणि सरासरी 5200 असा दर मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 500, कमाल सहा हजार तीनशे आणि सरासरी 5300 असा भाव मिळाला आहे.
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 3200, कमाल 5500 आणि सरासरी 4350 असा भाव मिळाला आहे.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 100, कमाल 4500 आणि सरासरी तीन हजार रुपये असा भाव मिळाला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान दोन हजार, कमाल 4000 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 3000, कमाल 4000 आणि सरासरी 3500 असा दर मिळाला आहे.