शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ महिन्यात कांद्याचे बाजारभाव विक्रमी वाढणार, कारण काय? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशातून होणारी कांद्याची निर्यात मंदावली. या कारणामुळे देशांतर्गत कांद्याचा साठा वाढला. परिणामी कांदा बाजारभावात घसरण होण्यास सुरुवात झाली. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कांद्याचे बाजारभाव हळूहळू वाढू लागले आहेत.

यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वास्तविक फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात खूपच कमी भावात कांद्याची विक्री झाली. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले. अनेकांना पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळत होता.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

संपूर्ण जुलै महिन्यात कांदा 1500 ते 2500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला गेला. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर कांदा तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत होता. काही बाजारात याहीपेक्षा अधिक भाव मिळत होता. मात्र केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.

यामुळे बाजारभावात मोठी घसरण झाली. मात्र आता पुन्हा एकदा किमती पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कांद्याचे बाजारभाव 3 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव तर पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेत.

राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार केला तर या मार्केटमध्ये 8 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लिलावात कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आठ तारखेला 1639 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला.

येत्या दोन महिन्यात कांदा बाजारभाव वाढणार

बाजार अभ्यासकांनी कांद्याच्या दरात येत्या काही काळात विक्रमी वाढ होणार असा दावा केला आहे. तज्ञांच्या मते शेतकऱ्यांकडे सध्या खूपच कमी कांदा शिल्लक आहे. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची टिकवण क्षमता यंदा कमी असल्याने आपल्याकडील कांदा विकून टाकला आहे.

विशेष म्हणजे यावर्षी मान्सूनही खूपच कमजोर आहे. अनेक भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. तर काही भागात आत्ताच पावसाचे आगमन झाले आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांपैकी जवळपास दोन महिने राज्यात पाऊसच पडला नाही.

त्यामुळे कांद्याची लागवड प्रभावित झाली असून खूपच कमी शेतकऱ्यांनी यावर्षी कांद्याची लागवड केली आहे. यामुळे आगामी काळात मागणीप्रमाणे कांदा पुरवठा होणार नाही. दिवाळीत कांद्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे मात्र पुरवठा कमी राहणार असे सांगितले जात आहे.

हेच कारण आहे की येत्या दिवाळीत कांद्याचे बाजार भाव विक्रमी वाढणार असल्याचा दावा बाजार अभ्यासकांनी केला आहे. यामुळे आता तज्ञांचा हा अंदाज खरा ठरतो का आणि येत्या दोन महिन्यात कांद्याचे भाव वाढतात का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.