Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजार भावात तेजी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कांदा बाजाराच चित्र पालटल आहे. निवडणुकीच्या निकालाआधी कांद्याला बाजारात खूपच कवडीमोल दर मिळत होता. मात्र तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने सरकार स्थापित केल्यानंतर कांदा बाजारभावात सुधारणा होऊ लागली आहे.
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि दक्षिणेकडील राज्यांमधून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वधारल्यानंतर बाजारभावात सुधारणा होत आहे. विशेष बाब अशी की, कांदा निर्यात पुन्हा सुरू झाली असली तरी देखील निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क लागूच आहे.
यामुळे कांदा निर्यातीवर बंधन आहेत. या बंधनांच्या दबावाखाली निर्यात मंदावलेली पाहायला मिळत आहे. तथापि कांदा बाजार भावात निवडणुकीनंतर सुधारणा झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून आधी कवडीमोल दरात कांदा विकावा लागला असल्याने झालेले नुकसान या वाढीव दरातून भरून काढता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.
बाजारभावात तेजी आली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून आता सरकारने कांदा बाजारात ढवळाढवळ करू नये अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, आज अर्थातच 23 जून 2024 ला महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3500 आणि सरासरी 2600 असा भाव मिळाला आहे.
जुन्नर ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3500 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : आज रविवारी या उप बाजारात झालेल्या लिलावात उन्हाळी कांद्याला किमान 1151, कमाल 3200 आणि सरासरी 350 असा भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 500, कमाल 3200 आणि सरासरी 2550 असा भाव मिळाला आहे.
दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1400, कमाल 3500 आणि सरासरी 2800 रुपये भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 800, कमाल 3000 आणि सरासरी 1900 रुपये भाव मिळाला आहे.