Onion Rate Maharashtra News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कांद्याचे दर तेजीत आहेत. नवीन लाल कांद्याची अपेक्षित आवक होत नसल्याने कांद्याला चांगला भाव मिळतोय. कांद्याचे घटलेले उत्पादन अन वाढलेली मागणी यामुळे कांद्याला समाधानकारक भाव मिळत असून शेतकऱ्यांमध्ये अगदीच आनंदाचे वातावरण आहे.
काल झालेल्या लिलावात राज्यातील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. राज्य कृषी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार काल अकलूजच्या बाजारात कांद्याला सर्वाधिक 7100 रुपये प्रतिक्विंटल असा कमाल भाव मिळाला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अकलूज एपीएमसी मध्ये काल 225 क्विंटल हालवा कांदा आवक झाली. या मार्केटमध्ये कालच्या लिलावात हालव्या कांद्याला किमान 1100, कमाल 7100 आणि सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
या बाजारांमध्येही मिळाला कांद्याला विक्रमी दर
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल कांद्याला कमाल 7000, किमान 2000 आणि सरासरी 4500 प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. या बाजारात काल 17 हजार 502 क्विंटल कांदा आवक झाली होती. यासोबतच काल कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे.
या मार्केटमध्ये काल 325 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली असून यात उन्हाळी कांद्याला कमाल सहा हजार 950, किमान 5000 आणि सरासरी 6000 असा भाव मिळाला आहे. दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील काल कांद्याला चांगला दर मिळाला.
राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या बाजारात कालच्या लिलावात कांद्याला किमान 500, कमाल 6700 आणि सरासरी 4600 असा भाव मिळाला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्येही कांद्याला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला. या मार्केटमध्ये कालच्या लिलावात कांद्याला कमाल 6500, किमान 1000 आणि सरासरी 3750 असा भाव मिळाला आहे.