शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अखेर कांदा 4 हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलाच; ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला विक्रमी भाव, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Maharashtra : कांदा दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बाजारात मोठी तेजी आली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेर पासून कांदा दरात घसरण होण्यास सुरवात झाली होती.

फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात कांदा बाजार मंदीत होता. राज्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह जवळपास सर्वच बाजारात कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो असा भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील वसूल करता येत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी होती.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु जुलै महिन्यात कांद्याच्या दरात वाढ झाली. आता गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कांद्याला या हंगामातील विक्रमी दर मिळत आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या लिलावात राज्यात कांद्याचे कमाल बाजार भाव चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत.

सरासरी बाजार भाव देखील 2550 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारात कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल ते 2500 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे. यामुळे गेली कित्येक महिने ज्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले तो कांदा आता शेतकऱ्यांना हसवत आहे.

बाजारात आलेल्या तेजीमुळे राज्यातील कांदा उत्पादकांना चांगला दिलासा मिळत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये बफर स्टॉक मधील कांदा केंद्रशासन खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठवणार अशी बातमी वेगाने वायरल होत आहे.

मात्र यावर नाफेड कडून स्पष्टीकरण देण्यात आले असून एक परिपत्रक काढत नाफेड 15 सप्टेंबर नंतर बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विक्री बाबत निर्णय घेईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आता आगामी काही दिवस कांदा बाजारातील ही तेजी कायम राहील असा विश्वास व्यक्त केला जाऊ लागला आहे.

विशेष म्हणजे पुढल्या महिन्यात कांद्याचे किरकोळ बाजारातील दर 55 रुपये ते 60 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतील अशी शक्यता देखील तज्ञ लोकांकडून व्यक्त होत आहे. निश्चितच कांद्याच्या भावात एवढी विक्रमी वाढ झाली तर शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.

कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव

काल 14 ऑगस्ट रोजी झालेल्या लिलावात अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. या बाजारात काल 348 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. कालच्या लिलावात या बाजारात कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.