शेतकऱ्यांसाठी दिलासादायक…! कांदा बाजारभावातील तेजी कायम, राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 3,400 चा भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Maharashtra : कांदा बाजारात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून चांगली तेजी पाहायला मिळत आहे. कांदा बाजारात कांद्याला 1700 ते 2300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी भाव मिळत आहे.

विशेष बाब म्हणजे कमाल बाजारभावाने तर 3,000 रुपयाचा टप्पा गाठला आहे. काल-परवा अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला तब्बल चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला होता.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

निश्चितच सध्या कांदा बाजारात आलेली ही तेजी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष बाब अशी की या महिन्याच्या अखेरपासून कांदा बाजारात आवक कमी होण्याची शक्यता आहे.

यामुळे भावात आणखी वाढ होईल असा अंदाज नुकताच एका प्रतिष्ठित संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. क्रीसील नामक एका संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव 55 रुपये ते 60 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचणार असा दावा करण्यात आला आहे.

निश्चितच किरकोळ बाजारात जर 60 रुपये प्रति किलो पर्यंत कांद्याचे भाव पोहोचले तर याचा परिणाम हा घाऊक बाजारावर देखील पाहायला मिळेल आणि घाऊक बाजारातही बाजारभावात आणखी वाढ होईल असा आशावाद आता व्यक्त केला जात आहे.

दरम्यान आज झालेल्या लिलावात राज्यातील एका बाजारात 3400 प्रतिक्विंटल एवढा कमाल भाव नमूद करण्यात आला आहे. यामुळे आगामी काही दिवसात चार हजार रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत कांद्याचे बाजार भाव पोहोचतील आणि सरासरी बाजार भाव देखील 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 3400 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.

या बाजारात आज बारा हजार 44 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1350 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला असून 3400 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे.