कांदा दरात पुन्हा घसरण ! बाजारभाव 600 रुपयांनी घसरले, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना फटका, बाजारभाव आणखी घसरणार का ? तज्ञ म्हणतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून किरकोळ बाजारात आणि घाऊक बाजारात कांद्याच्या किमती तेजीत आल्या आहेत. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांनी कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर आता कुठे शेतकऱ्यांच्या शेतमालाला खऱ्या अर्थाने योग्य मोबदला मिळू लागला आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोल मिळत असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहायला मिळत आहेत. मात्र किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहेत.

दरम्यान सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने काही निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने बफर स्टॉक मधील कांदा पंचवीस रुपये प्रति किलो या दरात किरकोळ बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कांद्याचे किमान निर्यात मूल्य 400 डॉलर प्रति टन वरून वाढवून 800 डॉलर प्रति टन एवढे केले आहे.

या दोन्ही निर्णयाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. कारण की गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या घाऊक बाजारात किमती कमी झाले आहेत. राजधानी मुंबईमध्ये देखील कांद्याच्या किमती कमी झाल्या आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे.

मुंबईच्या मार्केटमध्ये कांद्याला परवापर्यंत तीन हजार रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत होता. मात्र यामध्ये काल मोठी घसरण झाली असून कालच्या लिलावात अर्थातच 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात कांद्याला 2800 ते 4800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे.

म्हणजेच बाजारभावात 200 रुपयांपासून ते 600 रुपये प्रति क्विंटल पर्यंतची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारातील किमती देखील वीस रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाल्या आहेत. किरकोळ बाजारातील किमती काल 80 ते 100 रुपये प्रति किलो वरून 60 ते 75 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्या आहेत.

याचा सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे सणासुदीच्या काळात शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत येत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाच्या अनैतिक धोरणाचा त्यांना फटका बसत असल्याचा आरोप केला आहे. एकंदरीत कांदा बाजारातील हा चढ उतार शेतकऱ्यांसाठी मारक ठरू लागला आहे.

जाणकार लोक काय म्हणताय

कांदा व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर मध्ये नवीन हंगामातील लाल कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दरातील हा चढ-उतार सुरूच राहणार आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव काही प्रमाणात कमी झाले आहेत मात्र बाजार भाव आणखी वाढू शकतात असा अंदाजही व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

राज्यातील इतर बाजारातील भाव

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : एक हजार पाचशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : तीन हजार रुपये प्रति क्विंटल ते ४५०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : एक हजार रुपये प्रति क्विंटल ते 4300 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : 2500 रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : पाच हजार रुपये प्रतिकूलते सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : पाचशे रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा