Onion Prices : राज्यासह संपूर्ण देशभरात नुकताच दिवाळीचा मोठा सण साजरा झाला आहे. दिवाळीच्या काळात लोकांनी मोठा पैसा खर्च केला आहे. फराळासाठी आणि मुला मुलींच्या कापडांसाठी मोठा पैसा खर्च झाला आहे. शेतकरी बापाने देखील आपल्या मुली मुलांसाठी दिवाळीच्या काळात पैसा खर्च केला आहे.
दिवाळीपूर्वी सोयाबीन कापूस कांदा बाजारात अपेक्षित दरात विकला जात नव्हता. शिवाय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांशी बाजार समित्या बंद होत्या. म्हणून शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी उसनवारीने पैसे घेऊन दिवाळीचा सण साजरा केला आहे.
बाजार समित्या सुरू झाल्यात की माल विकून पैसे फेडू अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आता दिवाळी उलटली आहे. बाजार समित्या पुन्हा एकदा शेतीमाल लिलावासाठी सुरू झाल्या आहेत. बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक देखील होत आहे.
पण बाजारात शेतमालाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये. दरम्यान दिवाळीनंतर किंचित भाव सुधारल्यानंतर पुन्हा एकदा कांद्याच्या किमतीत पडझड सुरू झाली आहे. यामुळे दिवाळीसाठी उसनवारीने घेतलेला पैसा आता फेडायचा कसा हा सवाल बळीराजाच्या पुढ्यात उभा ठाकला आहे.
कांद्याच्या लिलावासाठी जगात ख्यातनाम असलेल्या आणि आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून लोकप्रिय ठरलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात तब्बल 400 रुपये प्रति क्विंटल एवढी घसरण नमूद करण्यात आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता भर पडू लागली आहे. खरीप हंगामात लाल कांद्यासह सोयाबीन, कापूस यांसारख्या विविध पिकांच्या उत्पादनात घट आली असताना आता बाजारात शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव एपीएमसी मध्ये मंगळवारच्या तुलनेत काल बुधवारी उन्हाळ कांदा दरात तब्बल 410 रुपये प्रति क्विंटल एवढी घसरण झाली आहे. या एपीएमसी मध्ये मंगळवारी कांद्याला 3847 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता.
मात्र कालचा लिलावा द्या एपीएमसी मध्ये कांदा मात्र 3437 रुपये प्रति क्विंटल या दरात विकला गेला आहे. अर्थातच या बाजारात कांद्याच्या कमाल भावात तब्बल 410 रुपयाची घसरण झाली आहे. फक्त उन्हाळी कांदाच नाही तर लाल कांदा बाजारभावात देखील घसरण झाली आहे.लाल कांद्याचे भाव 347 रुपये प्रति क्विंटलने कमी झाले आहेत.
बाजार अभ्यासाकांनी सांगितल्याप्रमाणे, केंद्राने मध्यंतरी बफर स्टॉक मधील कांदा 25 रुपये प्रति किलो या दरात विकण्याचा निर्णय घेतला असल्याने याचा हा इफेक्ट आहे. केंद्र सरकार बफर स्टॉक मधील दोन लाख मेट्रिक टन कांदा 25 रुपये प्रति किलो या दरात किरकोळ बाजारात विक्री करत आहे. हा कांदा देशातील विविध मोठ्या शहरांमध्ये विकला जात असून यामुळे देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढली आहे.
यामुळे कांद्याच्या भावात घसरण झाली असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. लासलगाव एपीएमसी मध्ये कालच्या लिलावात उन्हाळ कांद्याला कमीत कमी २००० रुपये, सरांसरी ३२००, तर जास्तीत जास्त ३८४७ रुपये भाव मिळाला आहे. तसेच लाल कांद्याला कमीत कमी २,७५२ रुपये, सरासरी ४२००, तर जास्तीत जास्त ४,६५७ रुपये भाव मिळाला आहे.