Onion Price: देशात दिल्ली(Delhi Onion Price) आणि चेन्नईमध्ये कांद्याचा भाव 37 रुपये किलो, तर मुंबईत 39 रुपये आणि कोलकात्यात 43 रुपये किलो आहे. येत्या काही दिवसात कांद्याचे भाव गगनाला भिडणार असल्याची चाहूल लागली आहे. हे मोदी सरकाने अचूक हेरले आहे. वाढत्या भावला आळा घालण्यासाठी सरकारने काही पावले टाकली आहेत.
यावर्षी 17 फेब्रुवारीपर्यंत कांद्याची अखिल भारतीय सरासरी किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत 22.36 टक्क्यांनी कमी होती. अचानक कांद्याच्या किमती वाढू लागल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये मागील महिन्यांच्या तुलनेत किमतीत वाढ होत आहे अशा राज्यांसाठी योजनाबद्ध आणि लक्ष्यित पद्धतीने कांद्याचा बफर स्टॉक उपलब्ध करून देणे सुरू केले आहे.
बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लासलगाव(Lasalgaon Market Onion price) आणि पिंपळगाव घाऊक मंडईंमध्येही बफर स्टॉक मर्यादा जाहीर केली आहे.
कांद्याच्या भावात कुठे वाढ झाली
गेल्या काही आठवड्यांपासून किरकोळ कांद्याचे भाव हळूहळू वाढत आहेत. दिल्ली आणि चेन्नईमध्ये कांद्याचा भाव 37 रुपये प्रति किलो, मुंबईत 39 रुपये आणि कोलकात्यात 43 रुपये प्रति किलो होता. दरम्यान, मोदी सरकारच्या वतीने राज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी साठवणुकीच्या ठिकाणी 21 रुपये प्रति किलो दराने कांदा देण्यात आला आहे.
मंत्रालयाने सांगितले की, राज्यांना साठवणुकीच्या बाहेरील ठिकाणी 21 रुपये प्रति किलो दराने कांदा देण्यात आला आहे. ही भाजी मदर डेअरीच्या विक्री केंद्रांना वाहतूक खर्चासह 26 रुपये प्रति किलो दराने पुरवण्यात आली आहे.
कांदा हळूहळू महाग होत आहे
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून किरकोळ कांद्याचे भाव हळूहळू वाढत आहेत. दिल्ली आणि चेन्नईमध्ये कांद्याचा भाव 37 रुपये प्रति किलो, मुंबईत 39 रुपये आणि कोलकात्यात 43 रुपये प्रति किलो होता. मंत्रालयाने पुढे सांगितले की, उशिरा वाढणाऱ्या खरीप (उन्हाळी) कांद्याची आवक स्थिर आहे आणि मार्च 2022 पासून रब्बी (हिवाळी) पिकाच्या आगमनापर्यंत स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात काय होऊ शकते
महाराष्ट्रात नाशिक(Maharashtra Onion Price) आणि पुणे पट्ट्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. त्याच बरोबर सोलापूर मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची मोठी बाजार पेठ आहे. महाराष्ट्रातील कांदा हैद्राबाद, बंगलोर, कोलकाता, दिल्ली आणि गुजरात या ठिकाणी पाठविला जातो. केंद्र सरकारच्या बफर धोरणामुळे स्टॉक(Bufer stock) धोरणामुळे कांद्याला भाव कमी मिळू शकतो.
“अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरीय हस्तक्षेपासाठी इतर राज्यांनाही पीएसएफ तयार करण्याची विनंती केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे,”