कांद्याचे बाजारभाव कमी करण्यासाठी महाराष्ट्रात नेपाळमधून कांदा आयात होणार का ? केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी स्पष्टच सांगितले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion News : गेली पाच ते सहा महिने अगदी कवडीमोल दरात कांदा विकल्यानंतर आता कुठे कांदा उत्पादकांना दिलासा मिळत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कांदा बाजार भावात विक्रमी वाढ झाली आहे. खरंतर कांद्याच्या बाजारात गेल्या महिन्याभरापासूनच सुधारणा पाहायला मिळत आहे.

कांद्याचे भाव गेल्या महिन्याभरापासून, अगदी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सातत्याने थोडे-थोडे वाढत आहेत. पण आता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कांद्याचा बाजार चांगलाच तेजीत आला आहे. बाजारातील ही तेजी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून गेली सहा महिने तोट्यात असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारात कांद्याचे सरासरी भाव दोन हजार रुपये प्रतिक्विंटल ते 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. काही बाजारात मात्र 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळत आहे. विशेष बाब अशी की राज्यातील काही निवडक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे कमाल बाजार भाव 3000 रुपये प्रति क्विंटल व त्यापेक्षा अधिक झाले आहेत.

साहजिकच बाजारातील ही तेजी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी असून यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधानाचे वातावरण यावेळी पाहायला मिळत आहे. अशातच मात्र केंद्र शासनाच्या माध्यमातून कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाली वाढत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये वेगाने व्हायरल होत आहेत.

केंद्र शासन नाफेडच्या माध्यमातून खुल्या बाजारात बफर स्टॉक मधील कांदा विक्री करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच वाढलेले भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नेपाळमधून देखील कांद्याची आयात होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रात कांदा विक्री केला जाणार नाही तसेच नेपाळमधून आयात केलेला कांदा महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत येणार नाही. खरंतर गेल्या काही दिवसांपासून नाफेडकडून खुल्या बाजारात कांदा विक्री होणार अशा चर्चा रंगत आहेत.

यामुळे सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात राजकारण तापले आहे. कांदा उत्पादक या मुद्द्यावर आक्रमक बनत चालले आहेत. अशा परिस्थिती भारती पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच काल नाफेडने देखील एक महत्त्वाचे परिपत्रक काढत नाफेड खुल्या बाजारात कांदा विक्री करण्याबाबतचा निर्णय 15 सप्टेंबर नंतर घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

यामुळे निश्चितच कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. तसेच केंद्र शासनाने नेपाळमधून कायदा आयात करण्यासाठी परवानगी दिली असल्याने या निर्णयाचा देखील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र केंद्र शासनाने ही परवानगी ज्या राज्यांना कांद्याची गरज आहे त्याच राज्यांना देऊ केली आहे.

शिवाय ज्या राज्यांना कांद्याची गरज आहे ते नेपाळमधूनच कांदा आयात करतील असे नाही तर ते इतर राज्यांमधून देखील कांदा मागवू शकतात. दरम्यान, नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात होणार नाही असे मत भारती पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच विरोधकांच्या माध्यमातून केंद्र शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनचा आणि नेपाळमधून कांदा आयातीला दिलेल्या परवानगीचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

एकंदरीत भारती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नाफेड कांदा विक्री करणार नाही आणि महाराष्ट्रात नेपाळमधून देखील कांदा आयात होणार नाही यामुळे कांद्याचे बाजार भाव आगामी काही दिवस तेजीतच राहतील अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.