Onion Market Update : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आज थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता मकर संक्रांतिपूर्वीच कांदा दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा 1500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकला जात होता. परंतु आज राज्यातील काही प्रमुख एपीएमसी मध्ये कांदा दारात मोठी वाढ पाहायला मिळत आहे.
येत्या चार दिवसात मकर संक्रांतिचा पर्व येणार आहे आणि अशातच कांदा दर वाढले असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. आज मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव या मार्केटमध्ये नमूद झाला आहे.
याशिवाय खेड चाकण, कराड या मार्केटमध्ये देखील कांद्याचा सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक होते. या मार्केटप्रमाणे इतरत्र मात्र कांदा दरात फारशी वाढ झालेली नाही. इतर बाजारात 1500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी सरासरी बाजार भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात झालेल्या कांदा लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई- कांदा बटाटा मार्केट :- आज या मार्केटमध्ये 10966 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 972 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
खेड- चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4500 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 287 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
कराड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 99 क्विंटल हालवा कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 18000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1651 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव-निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 900 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 820 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1455 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1370 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला- आंदरसूल कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 12000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1275 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव- विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1800 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1751 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 8000 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1454 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 13731 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 17000 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1710 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.