शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! मान्सूनचा विलंब कांदा बाजारभावासाठी ठरणार फायदेशीर, आणखी ‘इतके’ दिवस कांद्याचे भाव राहणार तेजीत, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market News : जानेवारी 2023 च्या अखेर पासून कांद्याची आवक वाढली. फेब्रुवारीत आवक दुपटीने वाढली. परिणामी फेब्रुवारीपासून कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली. फेब्रुवारी ते जवळपास जून पर्यंत कांदा बाजार दबावात राहिला. देशांतर्गत मागणी कमी, आवक जास्त आणि बांगलादेश तसेच श्रीलंका या दोन प्रमुख देशात ठप्प झालेली कांदा निर्यात म्हणून कांद्याचे बाजार भाव कमी झाल्याचे सांगितले गेले.

मात्र गेल्या महिन्याभरापासून, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांदा बाजार पुन्हा एकदा तेजीत आला आहे. राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळू लागला आहे. सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची आवक होत असून चांगल्या मालाला सरासरी 1500 ते 1900 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कमाल बाजार भाव 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. मात्र हा भाव काही मोजक्याच शेतकऱ्यांना मिळत आहे. पिंपळगाव एपीएमसी मध्ये गेल्या आठवड्याभरात प्रति क्विंटल 551 रुपयांची वाढ नमूद करण्यात आली आहे. एकंदरीत सध्या उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात वाढीचा ट्रेंड आहे आणि हा ट्रेंड आणखी काही दिवस कायम राहणार असा अंदाज आहे.

व्यापारी आणि निर्यातदारांनी सांगितल्याप्रमाणे कांद्याच्या पट्ट्यात मॉन्सूनने ओढ दिली आहे. सुरुवातीला मान्सून येण्यास विलंब झाला आणि आता भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असल्याने खरीप कांद्याच्या लागवडीला महिनाभराचा विलंब होणार असल्याचे मत व्यापाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

यामुळे कांद्याच्या भाववाढीचा आलेख कायम राहणार असा अंदाज व्यापाऱ्यांसह निर्यातदारांकडून बांधला जात आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 1 ऑगस्ट रोजी एक हजार 350 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला होता.

यात दुसऱ्या दिवशी 50, तिसऱ्या दिवशी 150, चौथ्या दिवशी 250, पाचव्या दिवशी 400 रुपयांची वाढ झाली. काल झालेल्या लिलावात पिंपळगाव एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.

एकूणच या बाजारात गेल्या आठवड्याभरात असून भाव वाढीचा ट्रेंड असून व्यापाऱ्यांनी आगामी काही दिवस हा ट्रेंड कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. निश्चितच गेली अनेक महिने कवडीमोल दरात कांदा विकल्यानंतर आता शेतकऱ्यांना वाढीव दरामुळे दिलासा मिळणारा असा आशावाद व्यक्त होत आहे.