Onion Market News : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. कृषी तज्ञांनी कांदा दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. खरं पाहता, 2022 मध्ये कांदा उत्पादकांना आपला सोन्यासारखा कांदा अतिशय कवडीमोल दरात विकावा लागला आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील पहिला पंधरवाडा वगळता जवळपास 2022 मध्ये कांद्याला नगण्य असाच दर मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात कांद्याला 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळत होता तर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळत होता. निश्चितच त्यावेळी कांद्याला विक्रमी दर मिळत होता.
परंतु कांदा दरात झालेली वाढ जास्त काळ टिकू शकली नाही आणि नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यापासून कांदा तर घसरण झाली अन कांदा सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जाऊ लागला. दरम्यान आता गेल्या आठवडाभरापासून यामध्ये थोडीशी सुधारणा होत असून कांदा दरात वाढ नमूद केली जात आहे.
कांद्याला सध्या 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळू लागला आहे. कमाल बाजार भाव 2000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक झाला आहे. काही एपीएमसी मध्ये कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळू लागला आहे. मात्र सरासरी कांदा दरात अपेक्षित अशी वाढ झालेली नाही यामुळे शेतकरी अजूनही भाव वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांजवळ असलेला जुना कांदा आता संपत चालला असून बाजारात नवीन लाल कांदा आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोलापूर एपीएमसी मध्ये देखील कांद्याची आवक वाढली आहे. सोमवारी झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये 602 गाड्यांची आवक झाली होती.
काल झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. निश्चितच गेल्या आठवड्याभरापासून कांदा दरात वाढ होत असली तरी देखील शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे अजूनही कांद्याला भाव मिळत नाहीये.
यामुळे शेतकरी बांधव कांदा दरात वाढ होईल अशी आशा बाळगून आहेत. दरम्यान जाणकार लोकांनी मकर संक्रांतीनंतर कांदा दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. जाणकार लोकांच्या मते यावर्षी जुना कांदा बाजारात जास्त काळ राहिल्याने कांदा दरात घसरण झाल्याचे आढळून आले आहे.
मात्र आता जसजसा बाजारातून जुना कांदा बाजारातून हद्द बाहेर होईल तसतसा नवीन लाल कांद्याचा भाव वाढेल असं काही जाणकारांनी नमूद केल आहे. निश्चितच कांदा दर वाढीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.