Kanda Niryat : केंद्रातील सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या गडबडीत शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील सरकारने घाईघाईत कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्र सरकारने डिसेंबर 2023 मध्ये निर्यात बंदी लागू केली होती. मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी कायम राहणार होती. मात्र मध्यंतरी सरकारने मार्च 2024 नंतरही निर्यात बंदी सुरूच राहणार अशा आशयाचे शासन परिपत्रक काढले.
यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली. निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नव्हता. परिणामी सरसकट निर्यात खुली झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आली.
ऐन निवडणुकीच्या काळात निर्यात बंदीचा मुद्दा मोठा गाजला. दरम्यान निवडणुकीमध्ये निर्यात बंदीचा मुद्दा अंगलट येऊ नये यासाठी केंद्रातील सरकारने घाई गडबडीत निर्यात सुरू केली. निर्यात सुरू झाल्यानंतर तरी मालाला चांगला भाव मिळणार अशी आशा कांदा उत्पादकांना होती.
मात्र प्रत्यक्षात निर्यात सुरू झाल्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे चित्र आहे. अजूनही राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याचे बाजार भाव दबावातच आहेत. तथापि काही बाजारांमध्ये कांद्याला कमाल 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू लागला आहे.
मात्र अशा बाजारांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. यामुळे या निर्यात बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता आपण आज राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 2500 आणि सरासरी 2000 रुपये असा भाव मिळाला आहे.
पेन कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 2200, कमाल 2400 आणि सरासरी 2200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 550, कमाल 2300 आणि सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
वाई कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1 हजार, कमाल 2200 आणि सरासरी 1800 रुपये भाव मिळाला आहे.
कराड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1500, कमाल 2200 आणि सरासरी 2200 असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 700, कमाल 2200 आणि सरासरी 1400 रुपये भाव मिळाला आहे.