Onion Farming : कांदा हे पीक संपूर्ण भारतात उत्पादित केले जाते. मात्र देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा यामध्ये मोठा वाटा आहे. एकट्या महाराष्ट्रात देशाच्या एकूण कांदा उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन घेतले जाते.
आपल्या राज्यात खरीप लेट खरीप आणि रब्बी अशा तीनही हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र या तीनही हंगामातील एकूण कांदा उत्पादनापैकी जवळपास 65 टक्के उत्पादन हे रब्बी हंगामात घेतले जाते.
अर्थातच रब्बी हंगामात आपल्या राज्यात सर्वाधिक कांदा लागवड केली जाते. या रब्बी हंगामात देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी कांदा लागवड होण्याची शक्यता आहे. मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान कमी पाऊस बरसला असल्याने रब्बी हंगामातील कांदा लागवडीखालील क्षेत्र थोडे कमी होईल असे काही जाणकार लोकांनी सांगितले आहे.
पण तरीही प्रमुख कांदा उत्पादक भागात विशेषता ज्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडला आहे त्या ठिकाणी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होईल असे चित्र तयार होणार आहे.
खरंतर रब्बी हंगामात कांद्याचे चांगले निरोगी उत्पादन घेतले जाते. मात्र अनेकदा कांदा पिकात वाढणाऱ्या तणामुळे पिकात रोगराईचे सावट तयार होते. यामुळे रब्बी हंगामातून जर कांद्याचे चांगले निरोगी आणि दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर पिकातील तणाचे वेळीच नियंत्रण करणे अतिशय आवश्यक ठरते.
दरम्यान आज आपण कांदा पिकातील तणाचे नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या तननाशकाचा वापर केला पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण ज्या तणनाशकाची माहिती जाणून घेणार आहोत ते तणनाशक कांदा पिकातील तणनियंत्रणासाठी खूपच उत्कृष्ट आहेत.
कांदा पिकातील तण नियंत्रणासाठी उत्कृष्ट तन नाशके
गोल + टरगा सुपर : हे तणनाशकाचे कॉम्बिनेशन कांदा पिकासाठी सर्वोत्कृष्ट ठरते. या हर्बिसाइड चा वापर करून कांदा पिकातील तनावर योग्य पद्धतीने नियंत्रण मिळवता येते.
डिकेल अदामा : अदामा कंपनीचे डिकेल हे एक उत्कृष्ट तणनाशक आहे. कांदा पिकातील तण नियंत्रणासाठी हे एक उत्कृष्ट तणनाशक ठरते. यामुळे तणाचा समूळ नाश होतो.
ऑक्सिम IIL : कांदा पिकातील तण नियंत्रणासाठी यादेखील तणनाशकाचा वापर केला जाऊ शकतो. ऑक्झिम हे कांदा पिकासाठी एक प्रमुख हर्बीसाईड आहे. या हर्बीसाईडचा वापर खूपच उपयोगी ठरतो.
वनकिल धानुका : हे हर्बीसाईड देखील कांदा पिकातील तणाच्या नायनाटासाठी फायदेशीर ठरते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव धानुका कंपनीच्या या तनानाशकावर विश्वास दाखवतात.