Nitin Gadkari Viral Tweet : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून देशभरात मोठमोठी महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राला देखील विविध पायाभूत सुविधा पुरवल्या जात आहेत. राज्यात पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. तसेच नाशिक शहरात निओ मेट्रो प्रकल्प सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने देशभरातील महत्त्वाची शहरे परस्परांना रेल्वे मार्गाने जोडण्याचे काम सुरू आहे. वेगवेगळ्या महामार्गांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातही विविध महामार्गांची कामें केली जात आहेत. राज्याला समृद्धी महामार्गासारख्या वर्ल्ड क्लास महामार्गांची भेट दिली जात आहे.
अशातच आता महाराष्ट्रातील पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये हवेत उडणारी बस धावणार आहे. कदाचित हे वाचून तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे शंभर टक्के खरे आहे. दस्तूर खुद्द केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे.
गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून दिलेल्या माहितीनुसार, आपल्या देशात लवकरच हवेत उडणारी बस धावणार आहे. विशेष म्हणजे त्यांनी या बसची पाहणी देखील केली आहे. चला तर मग गडकरी यांनी हवेत उडणाऱ्या बसबाबत काय महत्त्वाची घोषणा केली आहे याविषयी जाणून घेऊया.
काय म्हटले गडकरी?
नुकत्याच काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी प्राग दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यातून परतत असताना त्यांनी संयुक्त अरब अमिराती येथील शारजाह या शहरात भेट दिली होती. यादरम्यान त्यांनी हवेत उडणाऱ्या बसेस बाबत माहिती जाणून घेतली. त्यांनी यावेळी युस्काय कंपनीबाबत आणि हवेत चालणाऱ्या बसेसबाबत म्हणजे स्कायबस बाबत माहिती जाणून घेतली.
त्यांनी या बस मध्ये बसून याची चाचणी देखील घेतली. तसेच स्काय बस एक शाश्वत, गर्दी-मुक्त शहरी गतिशीलता समाधान प्रदान करते असे नितीन गडकरी यांनी सांगितले असून हे तंत्रज्ञान बेंगळुरू, पुणे, नागपूर आणि दिल्ली या भारतीय शहरांमध्ये प्रभावी ठरेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान लवकरच भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी सांगितले आहे. याचाच अर्थ भारतातही लवकरच हवेत उडणारी बस धावणार हे नितीन गडकरी यांच्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता भारतात हवेत चालणारी बस केव्हा धावणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.