NHAI Expressway : गेल्या काही वर्षांपासून राज्यासह संपूर्ण देशात मोठ-मोठ्या महामार्गाची कामे पूर्ण केली जात आहेत. आपल्या राज्यातही विविध महामार्गाची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्ग हा त्यापैकीच एक आहे. उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई या दरम्यान हा महामार्ग विकसित केला जात आहे. या मार्गाचे आत्तापर्यंत 600 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. हा एकूण 701 किलोमीटर लांबीचा मार्ग असून उर्वरित 100 किलोमीटरचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.
या प्रकल्पाचा नागपूर ते भरवीर हा मार्ग पूर्ण झाला आहे आणि भरवीर ते मुंबई दरम्यान लवकरच हा मार्ग पूर्ण होणार आहे. येत्या काही महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. याशिवाय मुंबई ते दिल्ली दरम्यान महामार्ग विकसित केला जात आहे. हा महामार्ग १३८२ किलोमीटर लांबीचा असून याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त बारा तासात पूर्ण करता येईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. याशिवाय नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग देखील जाणार आहे. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश राज्यातही मोठ्या प्रमाणात महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. UP मध्ये गोरखपूर-शामली द्रुतगती मार्ग आणि गंगा द्रुतगती मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यासोबतच आता उत्तर प्रदेश मध्ये आणखी एक महामार्ग तयार केला जाणारा आहे. राजधानी दिल्ली जवळ असलेल्या उत्तर प्रदेश मधील नोएडा ते कानपूर दरम्यान हा महामार्ग तयार केला जाणार आहे. नोएडा ते कानपूर दरम्यान विकसित होणारा हा मार्ग 380 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामुळे नोएडा ते उत्तर प्रदेशमधील औद्योगिक नगरी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या कानपूरदरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
खरंतर आधी कानपूर ते हापुड दरम्यान महामार्ग बनवला जाणार होता. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला असून नोएडा ते कानपूर दरम्यान महामार्ग विकसित केला जाईल असे वृत्तसमोर आले आहे. सोबतच हापूड-नोयडा एक्सप्रेस मिला जोडण्यासाठी 60 किलोमीटर लांबीचा एक कनेक्टर रोड देखील बनवला जाणार आहे. हा नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला एक्सप्रेस वे कानपूर एअरपोर्टला नोयडा एअरपोर्ट सोबत जोडणार आहे. विशेष म्हणजे हा नोएडा-कानपूर एक्सप्रेस वे 2026 पर्यंत पूर्णपणे बांधून तयार होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.