आनंदाची बातमी ! 1400 कोटी खर्च करून NHAI विकसित करणार नवीन महामार्ग, मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे ला जोडला जाणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHAI New Expressway : सध्या महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात महामार्गांचे कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. सध्या संपूर्ण राज्यात महामार्गाचे जाळे तयार केले जात आहे. राज्यात मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. हा 700 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आत्तापर्यंत या महामार्गाचे सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे उर्वरित 100 किलोमीटरचे काम देखील जलद गतीने सुरु आहे.

सध्या नागपूर ते भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून भरवीर ते मुंबई पर्यंतचे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. नवीन वर्षात समृद्धी महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. याशिवाय पुढल्या वर्षी नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे देखील काम सुरू होऊ शकते असे सांगितले जात आहे. तसेच सध्या मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस वेचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.

दरम्यान या मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे संदर्भातच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे ट्रान्स हरियाणा एक्स्प्रेस वेशी जोडला जाणार आहे. यासाठी एका नवीन मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. हा 86 किलोमीटरचा नवीन मार्ग तयार करण्यासाठी 1400 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

हरियाणातील नारनौल ते राजस्थानमधील अलवरपर्यंत हा महामार्ग बांधण्यात येणार आहे. NHAI या प्रकल्पासाठी सुमारे 1400 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा नव्याने विकसित होत असलेला मार्ग सहा पदरी राहणार आहे.

हा एक्स्प्रेस वे राजस्थानमधील अलवर येथून मुंबई द्रुतगती मार्गावर सुरू होईल आणि राजस्थानमधील कोटपुतलीजवळील पणियाला गावाजवळ दिल्ली-जयपूर एक्स्प्रेस वेशी जोडला जाणार आहे. सध्या ट्रान्स हरियाणा एक्सप्रेसवे दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवेला पणियालाजवळ जोडलेला आहे.

या नव्याने विकसित होत असलेल्या महामार्गामुळे पंजाब अंबाला चंदीगड येथून मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या राज्यांमध्ये मुंबईकडील प्रवास हा वेगवान होणार असून प्रवासाचे जवळपास दोन तास वाचणार आहेत. शिवाय मुंबई मधील जनतेला देखील उत्तर भारतात प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा