2023 मध्ये सर्वसामान्यांसाठी सुरू झालेत NHAI ने विकसित केलेले ‘हे’ दोन महत्वाचे महामार्ग ! कसे आहेत रूट ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHAI New Expressway : येत्या काही दिवसात वर्ष 2023 संपणार आहे आणि नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. 2023 मध्ये भारताने अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण केली आहेत. देशातील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी या चालू वर्षात अनेक महत्त्वाची कामे झाली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थातच NHAI च्या माध्यमातून या चालू वर्षात दोन नवीन महामार्गांचे उद्घाटन झाले आहे. आता हे चालू वर्ष येत्या काही दिवसात संपेल आणि नवीन वर्ष सुरू होणार आहे. अशा स्थितीत आज आपण या वर्षात सुरू झालेल्या दोन नवीन महामार्गांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरे तर देशात गेल्या काही वर्षांपासून रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांमुळे आत्तापर्यंत देशात नवनवीन महामार्गांची उभारणी झाली आहे. आपल्या राज्यातही अनेक महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी काही महामार्गांचे कामे अंतिम टप्प्यात आली आहेत तर काही महामार्गांचे काम सुरू आहे.

विशेष म्हणजे काही एक्सप्रेस वे सर्वसामान्यांसाठी अंशतः सुरू देखील झाले आहेत. दरम्यान आता आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित झालेल्या बेंगलोर-म्हैसूर एक्सप्रेस वे आणि मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे : देशाची राजधानी दिल्लीला आर्थिक राजधानी मुंबईशी थेट जोडण्यासाठी हा महामार्ग तयार केला जात आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा 1350 किलोमीटर लांबीचा आहे. हा प्रकल्प दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.

या अंतर्गत विकसित होणारा महामार्ग हा मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या आठ पदरी महामार्गाचे सध्या स्थितीला युद्ध पातळीवर काम सुरू आहे. तसेच वर्ष 2023 मध्ये या मार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.  या 8 लेन एक्स्प्रेस वेचे काम अजूनही सुरू आहे.

8 मार्च 2019 रोजी माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या एक्स्प्रेस वेची पायाभरणी करण्यात आली. भूसंपादनासह या प्रकल्पासाठी 1,00,000 कोटी रुपयांचा खर्च होणार असा अंदाज आहे. हा एक्स्प्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांना परस्परांना जोडणार आहे.

या चालू वर्षात या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच दिल्ली ते जयपूर पूर्ण झाला असून यावर वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान संपूर्ण महामार्गाचे काम 2024 अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि हा संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

बेंगलोर-म्हैसूर एक्सप्रेस वे : हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यात आला आहे. या महामार्गाची लांबी 119 किलोमीटर एवढी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मार्ग 12 मार्च 2023 रोजी सुरू करण्यात आलाय. 119 किमी लांबीच्या बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवे प्रकल्पाला NH-275 असे नाव देण्यात आले असून हा 6-10 लेनचा मार्ग आहे.

यासाठी 8480 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आधी बेंगलोर ते मैसूर हा प्रवास करण्यासाठी तीन तासांचा वेळ लागत असे. मात्र हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त सव्वा तासात पूर्ण केला जात आहे. यामुळे बेंगलोर ते मैसूर हा प्रवास गतिमान झाला असून या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा देखील महामार्ग देशाच्या एकात्मिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा