मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस केव्हा सुरू होणार ? समोर आली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Vande Bharat Express : मराठवाडा विभागातील अर्थातच छत्रपती संभाजी नगर विभागातील हजारो नागरिक दररोज मुंबईला येत असतात. शिक्षणासाठी तसेच कामानिमित्त दररोज मुंबईला येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.

अशा परिस्थितीत मराठवाडा विभागातील नागरिकांसाठी भारतीय रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते जालना या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. ही गाडी छत्रपती संभाजी नगर मार्गे धावणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील एक हाय स्पीड ट्रेन आहे. पहिल्यांदा ही गाडी पाच वर्षांपूर्वी धावली होती. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी पहिल्यांदा सुरू झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे.

आतापर्यंत देशात 35 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. 35वी वंदे भारत एक्सप्रेस नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झाली आहे. नुकतीच सुरू झालेली ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली जात आहे.

म्हणजेच नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली जाणारी ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. दरम्यान आता राजधानी मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस देखील लवकरच सुरू होणार अशी आशा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस या चालू वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच येत्या 9 ते 10 दिवसात सुरु होऊ शकते. या चालू वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच या गाडीचे उद्घाटन होईल अशी आशा आहे.

या मार्गावर आठ डब्याची ट्रेन सुरू होणार आहे. अद्याप रेल्वे बोर्डाकडून या मार्गावर ही गाडी सुरू करण्यासाठी मंजुरी मिळालेली नाही. पण लवकरच ही मंजुरी मिळेल आणि मराठवाड्याला या हायस्पीड ट्रेनची भेट मिळेल असे बोलले जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा