नवी मुंबई, डोंबिवलीकरांसाठी खुशखबर ! ‘या’ महामार्गामुळे नवी मुंबई ते डोंबिवली प्रवास होणार मात्र 20 मिनिटात, 70% काम पूर्ण, केव्हा होणार सुरु? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Mumbai News : नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूरकरांसाठी एक अतिशय आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेला काही दशकात मुंबई शहराचा आणि मुंबई उपनगरांचा झपाट्याने विकास होत आहे. उपनगरांचा विकास अपेक्षेपेक्षा जलद गतीने होत आहे. यामुळे उपनगरांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे आणि सध्या उपनगरामध्ये असलेली वाहतूक व्यवस्था तोकडी पडू लागली आहे.

परिणामी मुंबईसह उपनगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही सर्वसामान्य बाब बनली आहे. यामुळे मात्र मुंबईकरांना तसेच उपनगरामधील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी मुंबई शहरात आणि उपनगरात विविध रस्ते विकासाची कामे केली जात आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए च्या माध्यमातून विविध रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. अशातच नवी मुंबई ते डोंबिवली हा प्रवास गतिमान करण्यासाठी आणि नवी मुंबई कल्याण डोंबिवली बदलापूर या परिसरातील एकात्मिक विकासासाठी ऐरोली-काटई नाका महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईवरून कल्याण डोंबिवली आणि बदलापूरला जलद गतीने पोहोचवणाऱ्या या महामार्गासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आमच्या हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या मार्गाचे काम 70% पर्यंत पूर्ण झाले आहे. विशेष बाब अशी की, उर्वरित 30 टक्के काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून नियोजित वेळेत हे काम पूर्ण होणार आहे.

केव्हा सुरू होणार हा मार्ग

ऐरोली-काटई नाका महामार्गाचे काम 70 टक्के पूर्ण झाल्याची माहिती संबंधितांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या मार्गातील पारसिक हिल डोंगररांगातील बोगद्याचे काम हे 70% पर्यंत पूर्ण झाले आहे. अर्थातच या मार्गाचे काम नियोजित वेळेत होणार आहे. हा महामार्ग पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये मे महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचा दावा केला जात आहे.

या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई, बदलापूर आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांचा प्रवास हा गतिमान होणार आहे. या मार्गामुळे दीड ते दोन तासांचा प्रवास मात्र वीस मिनिटात शक्य होणार आहे. हा ऐरोली-काटई नाका जोडरस्ता व भुयारी मार्ग प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे.

या महामार्गाची लांबी 12.30 किलोमीटर एवढी असून या मार्गाचे काम एकूण तीन टप्प्यात पूर्ण केले जात आहे. या मार्गामुळे नवी मुंबई ते डोंबिवली हा दीड ते दोन तासाचा प्रवास मात्र वीस मिनिटात पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. निश्चितच या मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील विकास सुनिश्चित होणार असून यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा आशावाद जाणकार लोकांनी देखील व्यक्त केला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा