NHAI विकसित करणार नवीन एक्सप्रेस वे ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलीय घोषणा, तयार होणार 700 किलोमीटरचा मार्ग, कसा असेल रूट ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Expressway : सध्या महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये रस्ते विकासाची अनेक कामे सुरु आहेत. रस्ते विकासाच्या विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रकल्पांची कामे अजून सुरू आहेत. विशेष म्हणजे काही रस्ते विकासाच्या कामाची नुकतीच घोषणा झाली आहे. असं म्हटले जाते की कोणत्याही विकसित देशात तेथील रस्ते महत्त्वाची भूमिका निभावत असतात.

यामुळे आपल्या देशात मोठ-मोठ्या महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. केंद्रातील मोदी सरकारने महामार्गाचे जाळे तयार करण्यासाठी भारतमाला परियोजना राबवली आहे. भारतमाला परियोजनेअंतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे तयार होत आहेत.

या परियोजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रात देखील काही महत्वाच्या महामार्गांचे कामे हाती घेण्यात आले आहेत. याशिवाय राज्य शासनाच्या माध्यमातूनही आपल्या राज्यात विविध महामार्गांची कामे केली जात आहेत. आपल्या राज्यात राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडतोय. सध्या स्थितीला या मार्गाचे सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. हा एकूण 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून उर्वरित 101 किलोमीटर लांबीचे काम येत्या नवीन वर्षात पूर्ण होईल अशी आशा आहे.

एकंदरीत, या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग अंतिम टप्प्यात आला असतानाच आता राज्यात नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. हा देखील महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातूनच तयार होणार आहे.

ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात विविध महामार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत त्याच धर्तीवर उत्तर प्रदेश राज्यातही मोठमोठ्या महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश राज्यात गोरखपुर ते शामली दरम्यान नवीन महामार्ग तयार होणार आहे.

हा एकूण 700 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून या महामार्गाची घोषणा दस्तुरखुद्द केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. हा मार्ग उत्तर प्रदेश मधील 22 जिल्ह्यांमधून जाणार आहे.

सध्या स्थितीला या मार्गासाठी डीपीआर अर्थातच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या महामार्गासाठी जवळपास 35 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध होणार आहेत.

हा मार्ग उत्तर प्रदेश मधील तिसरा सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. हा एक्सप्रेसवे शामली जिल्ह्यातील गोगवान जलालपूर येथून सुरू होईल आणि गोरखपूरपर्यंत जाणार आहे.

हा गोरखपूर-शामली ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे अयोध्या, संत कबीरनगर, बाराबंकी, गोंडा, बस्ती, बहराइच, लखनौ, सीतापूर, शाहजहांपूर, हरदोई, बदायूं, बरेली, रामपूर, मुरादाबाद, संभल, रामपूरसह उत्तर प्रदेशातील 22 जिल्ह्यांचा समावेश करेल. बिजनौर, ते मेरठ, मुझफ्फरनगर आणि सहारनपूर या जिल्ह्यातुन जाणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा