गुड न्युज ! ‘या’ शहरात तयार होतोय देशातील पहिला-वहिला सोलर एक्सप्रेस वे ; काय आहेत नवख्या महामार्गाच्या विशेषता ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात रस्ते विकासाच्या कामांनी मोठी प्रगती केली आहे. देशात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. विशेषतः केंद्र शासनाने भारतमाला परियोजनेचे काम हाती घेतल्यानंतर रस्ते विकासाच्या कामाला अधिक गती मिळाली आहे.

या परियोजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात ग्रीनफिल्ड महामार्ग तयार केले जात आहेत. महामार्गांचे जाळे विकसित करण्याचे धोरण केंद्रातील मोदी सरकारने आखले असून यामुळे देशातील शहरा-शहरांमधील अंतर कमी होत आहे.

यामुळे दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत आता मजबूत झाली आहे. महामार्गांच्या जाळ्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारित असून यामुळे कृषी, उद्योग, पर्यटन, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील प्रगती सुनिश्चित होत आहे.

यामुळे देशाचा एकात्मिक विकास साधला जात आहे. विशेष म्हणजे आता देशात सोलर एक्सप्रेस वे देखील तयार केला जात आहे. हा देशातील पहिला-वहिला सोलर एक्सप्रेस वे उत्तर प्रदेश मध्ये विकसित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश राज्यातील बुंदेलखंड एक्सप्रेस वे हा देशातील पहिला सोलर एक्सप्रेस वे म्हणून विकसित केला जाणार आहे. या महामार्ग लगत 1700 हेक्टर जमिनीवर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत.

या प्रकल्पातून सुमारे ५५० मेगा वॅट सोलर पावर जनरेट होणार असा दावा होतोय. हा महामार्ग गेल्यावर्षी सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे. आता या महामार्गा लगत सोलर पॅनल बसवले जाणार आहेत.

या सोलर पॅनल मधून तयार होणाऱ्या विजेच्या माध्यमातून रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या, आजूबाजू राहणाऱ्या लोकांना वीज आणि प्रवाशांना लाइटिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. या महामार्गाच्या दोन लेनच्या मध्यात प्रत्येकी वीस मीटरच्या अंतरावर सोलर पॅनल लावले जाणार आहेत.

विशेष म्हणजे या सोलर प्रकल्पाचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थातच पीपीपी तत्त्वावर केले जाणार आहे. यासाठी विविध नामांकित कंपन्यांनी रुची दाखवली आहे. बुंदेलखंड एक्सप्रेस वे हा चार पदरी महामार्ग आहे. मात्र हा महामार्ग भविष्यात सहा पदरी बनवला जाऊ शकतो.

या महामार्गाचे काम उत्तर प्रदेश एक्सप्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी च्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. हा 296 किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार करण्यासाठी जवळपास 14,850 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

हा महामार्ग बुंदेलखंड रिजनला इटाव्याजवळ आग्रा लखनऊ एक्सप्रेस वे ला जोडतो. हा मार्ग उत्तर प्रदेश मधील सात जिल्ह्यांमधून गेलेला आहे. यामुळे उत्तर प्रदेश मधील कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत अधिक सक्षम झाली आहे. यामुळे जिल्ह्यांमधील अंतर कमी झाले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा