खुशखबर ! देशात 2024 मध्ये ‘हे’ 3 महामार्ग होणार सुरू, मुंबई-दिल्ली महामार्गाचाही समावेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Expressway List : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या काही तासांचा काळ बाकी आहे. उद्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेट होईल आणि चालू वर्षाला निरोप दिला जाईल. त्यानंतर परवापासून नवीन वर्ष 2024 सुरू होणार आहे. या चालू 2023 वर्षात राज्यासहित देशातील विविध भागातील नागरिकांना वेगवेगळ्या विकास कामांची भेट मिळाली आहे.

या वर्षात अनेक छोटे मोठे प्रकल्प सुरू झाले आहेत. दरम्यान, पुढील वर्ष म्हणजे 2024 हे निवडणूकीचे वर्ष राहणार असल्याने आगामी वर्षात सर्वच महत्त्वाचे आणि मोठ्या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

आगामी वर्षात काही महत्त्वाच्या आणि मोठ्या महामार्गाची देखील सुरुवात होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुका एप्रिल किंवा मे 2024 मध्ये होणार असा अंदाज आहे. यामुळे एप्रिलच्या आधीच देशातील काही महामार्गांची कामे पूर्ण करून सर्वसामान्यांना असे महामार्ग खुले करून दिले जाणार आहेत.

कोणते महामार्ग तयार होणार

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा राष्ट्रीय राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणारा भारतातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित महामार्ग आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त बारा तासात पूर्ण होणार आहे.

हा देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असल्याचा दावा केला जात आहे. हा महामार्ग पुढील वर्षापर्यंत पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. गडकरींने दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत हा एक्स्प्रेस वे पूर्णपणे तयार आणि कार्यान्वित व्हायला हवा.

अर्थातच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच हा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. सध्या, एक्सप्रेसवेचा पहिला विभाग हरियाणातील सोहना आणि राजस्थानमधील दौसा दरम्यान सुरु आहे, जो अंदाजे 209 किलोमीटर लांबीचा आहे. या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांनीच केले आहे.

बेंगळुरू-चेन्नई द्रुतगती मार्ग : आगामी वर्षात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. याशिवाय बेंगलोर आणि चेन्नई या भारतातील दोन प्रमुख शहरांमध्ये विकसित होत असलेला नवा महामार्ग देखील पुढील वर्षी सुरु होण्याची दाट शक्यता आहे.

नुकत्याच काही महिन्यांपूर्वी नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, हा २६२ किमी लांबीचा बेंगळुरू-चेन्नई द्रुतगती मार्ग पुढील वर्षी निश्चितच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या द्रुतगती मार्गावरील हलक्या वाहनांची वेगमर्यादा ताशी १२० किमी राहणार अशी माहिती समोर आली आहे. परिणामी या दोन शहरांमधील प्रवास अधिक जलद होणार आहे.

द्वारका द्रुतगती मार्ग : राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि हरियाणा या दोन्ही राज्यांसाठी उपयुक्त असा हा महामार्ग पुढील वर्षी कोणत्याही परिस्थितीत सुरू केला जाणार आहे. खरे तर या मार्गाचे बऱ्यापैकी काम झाले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून वाढत्या प्रदूषणामुळे द्वारका द्रुतगती मार्गाचे बांधकाम सध्या थांबवण्यात आले आहे.

मात्र पुढील वर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी भारतातील पहिला उन्नत शहरी महामार्ग खुला होईल अशी अपेक्षा जाणकार लोकांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. हा एक्स्प्रेस वे जवळपास तयार झाला असून औपचारिक उद्घाटनापूर्वी काही सुधारणा केल्या जात आहेत. एक्सप्रेसवेचा सुमारे 19 किमीचा टप्पा हरियाणामध्ये येतो तर उर्वरित 10 किमीचा भाग दिल्लीमध्ये आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा