गुड न्यूज ! राजधानीत तयार होणार 670 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग, 40 हजार कोटींचा होणार खर्च, ‘या’ तीर्थक्षेत्राला जाणे होणार सोपे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. ज्या भागात वीज, रस्ते, पाणी उपलब्ध नाहीये तिथे या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. संपूर्ण देशभरात रस्ते विकासाची विविध कामे शासनाने हाती घेतली आहेत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजने अंतर्गत देशात 3000 किलोमीटर लांबीचे ग्रीन फील्ड कॉरिडोर म्हणजे हरित महामार्ग विकसित केले जात आहेत. त्यामुळे देशातील विविध भागात कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. शहरा-शहरांमधील अंतर कमी होत आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील विविध महामार्गाची निर्मिती झाली आहे तसेच काही महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत.

यामध्ये समृद्धी महामार्गाचे नाव प्रथम स्थानावर येते. या महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. हा मार्ग वर्तमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. या मार्गाचे सध्या स्थितीला सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित 100 किलोमीटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा मार्ग सध्या नागपूर ते भरवीर पर्यंत सुरु आहे.

डिसेंबर 2023 पर्यंत भरवीर ते मुंबई पर्यंतचा टप्पा देखील पूर्ण होईल अशी आशा आहे. या मार्गामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे. समृद्धी महामार्गाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जात आहे. या व्यतिरिक्त राज्यात इतरही अन्य महामार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत.

यामध्ये चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्गाचा देखील समावेश होतो. हा महामार्ग केंद्र शासनाकडून तयार केला जात आहे. याशिवाय दिल्ली ते कटरा दरम्यान देखील केंद्राच्या माध्यमातून  महामार्ग विकसित केला जात आहे. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे हा केंद्र शासनाचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.

या महामार्गाची नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली आहे. त्यांनी दिल्ली-कटरा एक्स्प्रेस वे आणि अमृतसर बायपासच्या बांधकामाची पाहणी केली आहे. यामुळे आज आपण या महामार्गाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

कसा आहे हा महामार्ग 

हा महामार्ग दिल्ली, अमृतसर, कटरा या महत्त्वाच्या शहरांना कनेक्ट करत आहे. या महामार्गाची एकूण लांबी 670 किलोमीटर असून या महामार्गामुळे दिल्लीहून अमृतसर आणि कटरा कडील प्रवास वेगवान होणार आहे. हा एक्स्प्रेस वे दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर मधून जाणार आहे. हरियाणा, पंजाब आणि जम्मू कश्मीर मधील नागरिकांची दिल्लीकडील कनेक्टिव्हिटी सुलभ होणार आहे.

राजधानीचा प्रवास यामुळे आणखी जलद होणार आहे. हा मार्ग हरियाणा राज्यात 137 किलोमीटर, पंजाबमध्ये 399 किलोमीटर आणि जम्मू-काश्मीरमध्ये 135 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 40,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. अंदाजे 670 किलोमीटर लांबीच्या एक्स्प्रेसवेद्वारे दिल्लीहून अमृतसरला 4 तासांत आणि कटराहून दिल्लीला 6 तासांत पोहोचता येणार आहे.

यामुळे वैष्णोदेवी ला जाणे देखील सोपे होणार आहे. सध्या रस्त्याने वैष्णोदेवीला पोहोचणे हे अतिशय जिकिरीचे काम आहे. त्यामुळे दिल्लीहून तिथे जाण्यासाठी लोक सहसा ट्रेनने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. पण हा महामार्ग तयार झाल्यानंतर वैष्णोदेवीकडील प्रवास रस्ते मार्गाने देखील सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.

या नवीन मार्गावर पूल बांधला जाणार आहे. त्यामुळे वैष्णोदेवीचा प्रवास अधिक सुकर होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. या मार्गावर आशियातील सर्वात लांब पूल बांधला जाणार आहे. या पुलाची लांबी 1300 मीटर एवढी राहणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांचा प्रवास खूपच जलद सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. वैष्णोदेवीला थेट कारने सुद्धा जाता येणार आहे.

हा एक्स्प्रेस वे 18 पॅकेजमध्ये बांधला जात आहे. याशिवाय 3 स्पर पॅकेजेस म्हणजेच जोड रस्ते देखील बनवले जात आहेत. हे काम २ टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. नितीन गडकरी यांनी देखील या मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा