खुशखबर ! डिसेंबरमध्ये सुरु होणार 600 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग, कसा असेल रूट ? कोणत्या भागासाठी ठरणार गेमचेंजर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. जेव्हापासून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी काम पाहण्यास सुरुवात केली आहे तेव्हापासूनच देशात रस्ते विकासाची कामे वाढली आहेत.

नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून देशात विविध महामार्गाची कामे सुरु आहेत. केंद्र शासनाने भारतमाला परियोजनेअंतर्गत देशात जवळपास 3 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित करण्याचे नियोजन आखले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या पार्श्वभूमीवर वेगाने काम सुरू असून आत्तापर्यंत काही महत्त्वाच्या महामार्गाची कामे पूर्ण देखील झाली आहेत. तर काही महामार्गांची कामे ही सध्या सुरू आहेत. आपल्या महाराष्ट्रातही अनेक महामार्गाची कामे केली जात आहेत.

काही महामार्गांची कामे केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहेत तर काही महामार्ग राज्य संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहेत. यात राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो. समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.

उर्वरित 100 किलोमीटरचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून डिसेंबर 2023 पर्यंत हा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त सुरत ते चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग देखील आपल्या महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या या महामार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे.

याशिवाय नागपूर-गोवा महामार्ग, कोकण ग्रीन फिल्ड महामार्ग, मुंबई शहरातील कोस्टल रोड प्रकल्प इत्यादी रस्ते विकासाची कामे आपल्या राज्यात प्रगतीपथावर आहेत. उत्तर प्रदेश मध्ये देखील विविध महामार्गाची कामे शासनाच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहेत. कोणत्याही विकसित राज्यात प्रदेशात किंवा देशात तेथील दळणवळण व्यवस्था प्रामुख्याने रस्ते मार्ग महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

हेच कारण आहे की उत्तर प्रदेश राज्यातही वेगवेगळ्या महामार्गांची कामे प्रगतीपथावर असून यामध्ये गंगा एक्सप्रेस वे चा देखील समावेश होतो. दरम्यान या गंगा एक्सप्रेस वे बाबत अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गंगा एक्सप्रेस वे हा लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार आहे.

कसा आहे गंगा एक्सप्रेस वे चा रूट ?

गंगा एक्सप्रेस वे मेरठ ते प्रयागराज या दोन शहरांना कनेक्ट करतो. या महामार्गाची एकूण लांबी 594 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे जवळपास सहाशे किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असून यामुळे मेरठ ते प्रयागराज हा प्रवास गतिमान होणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत 18 फ्लाय ओवर आणि आठ रोड ओवर ब्रिज तयार केले जाणार आहेत.

या मार्गाचे काम एकूण 12 पॅकेज मध्ये आणि चार टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. आतापर्यंत या महामार्गाचे जवळपास 22 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 78% काम देखील जलद गतीने पूर्ण केले जाणार असून हा महामार्ग कुंभमेळ्यापूर्वी सुरू केला जाणार आहे.

प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी या महामार्गाचे लोकार्पण करण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. अर्थातच या महामार्गाचे डिसेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण केले जाईल आणि 2025 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे.